Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

COVID-19 : 'या' राज्यात झटकन वाढले कोरोना रुग्ण, कोविडने वाढवली चिंता, कुठे किती रुग्ण वाचा

COVID-19 cases India : कोरोना विषाणू देशातील काही राज्यात सक्रीय असून येथील रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत केरळ पुढे असून त्यानंतर गुजरातमध्ये प्रकोप वाढताना दिसत आहे, गुजरातने महाराष्ट्राला कोरोना रुग्णाच्या संख्येत मागे टाकले आहे.

देशात कोरोनाची लाट येऊ शकते की नाही यासंदर्भात तूर्त आरोग्य विभागाने ठोस काही जाहीर केले नाही परंतु सध्याची स्थिती काळजी करण्यासारखी आहे. केरळ सध्या सर्वात मोठे हॉटस्पॉट बनले आहे, तिथे दोन हजारांवर सक्रिय प्रकरणे आहेत.

COVID-19 cases India

गुजरात ११०९ केसेससह दुसऱ्या क्रमांकावर

गुजरात ११०९ प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, या राज्याने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. मंगळवार, १० जून रोजी देशभरात तीन मृत्यू झाले, यामध्ये दिल्ली, झारखंड आणि केरळमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे तर, झारखंडमधील हा पहिला कोरोना मृत्यू आहे.

Take a Poll

कोणत्या राज्यात किती कोरोना रुग्ण (१ जानेवारी - १० जून २०२५):

  • एकूण सक्रिय प्रकरणे: ६८१५ एकूण
  • गेल्या २४ तासांत मृत्यू : ३
  • गेल्या २४ तासांत ३२४ नवीन प्रकरणे :

राज्यानुसार आकडेवारी (१० जून २०२५)

  • केरळ: २०५३ प्रकरणे, १६ मृत्यू
  • गुजरात: ११०९ प्रकरणे, २ मृत्यू
  • दिल्ली: ६९१ प्रकरणे, ८ मृत्यू
  • महाराष्ट्र: ६१३ प्रकरणे, १८ मृत्यू
  • पश्चिम बंगाल: ७४७ प्रकरणे, १ मृत्यू

कोरोना संसर्ग - काय करावे काय नको?

खोकताना व शिंकताना रूमालाचा वापर करावा.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणे इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.
अशा प्रकारची लक्षणे, इतर आजाराने व्याधीग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

काय आहेत कोरोनाची लक्षणे

घसा खवखवणे
थकवा
सौम्य खोकला
ताप
नाक बंद होणे
डोकेदुखी
मळमळ
भूक न लागणे
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल बिघाड
विशेषतः चव किंवा वास कमी होणे

हा व्हेरीयंट किती आहे संसर्गजन्य?

चीनमधील आकडेवारीनुसार, NB.1.8.1 प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता इतर ओमिक्रॉन उप-प्रकारांपेक्षा जास्त आढळून आलेली नाही.

कोरोनापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

1. स्वच्छता - साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा (किमान 20 सेकंद)
साठ टक्के अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरा.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.

2. मास्क - सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी नेहमी मास्क घाला.
सर्जिकल मास्क किंवा N95 मास्क चांगले संरक्षण प्रदान करतात.

3. सामाजिक अंतर राखा - इतरांपासून कमीत कमी 6 फूट अंतर ठेवा.
विशेषतः खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या लोकांपासून थोडे लांबच राहीलेले बरे. आजारी वाटत असल्यास घरीच रहा.

4. डाॅक्टरांचा सल्ला - जर तुम्हाला सौम्य लक्षणे (उदा. ताप, खोकला, थकवा) जाणवत असतील तर स्वतःला घरी वेगळे करा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5. लसीकरण - कोविड-19 चे सर्व डोस (बूस्टरसह) वेळेवर घ्या. ही लस संसर्गाची तीव्रता कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

6. खोकला आणि शिंकताना सावधगिरी - खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा कोपर वापरा. वापरलेले टिशू ताबडतोब कचऱ्याच्या डब्यात टाका.

7. आरोग्य विभागाच्या सूचना - सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आरोग्य मंत्रालय किंवा WHO ने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+