सावधान! सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 6 हजारांवर, महाराष्ट्रात किती रुग्ण एकूण मृत्यू किती? वाचा
Coronavirus Updates maharashtra india : कोरोनाचा संसर्ग तीन ते चार वर्षांपुर्वी देशाने अनुभवला आता पुन्हा कोरोनाने देशाला विळखा घालायला सुरुवात केल्याचे सध्याच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. कोरोना संसर्गामुळे देशात आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाले असून सहा हजारांवर रुग्णसंख्या पोहचली आहे.
कोरोना व्हायरस पूर्वीइतका भयावह नसला तरी धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. ताज्या सरकारी आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतात पुन्हा एकदा संसर्गाची प्रकरणे हळूहळू वाढू लागली आहेत. विशेषतः काही राज्यांमध्ये, सक्रिय प्रकरणांची संख्या चिंता वाढवत आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि केरळ राज्य आघाडीवर आहेत तर राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्येने चिंता वाढत आहे.

आज देशात कोरोनाची स्थिती काय?
8 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 6133 सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये असे अनेक रुग्ण होते जे आधीच अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त होते.
जानेवारीपासून 5484 लोक झाले कोरोनातून बरे
या वर्षी 1 जानेवारीपासून संसर्गाचा विचार केल्यास एकूण 5484 लोक बरे झाले आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की जरी प्रकरणे कमी असली तरी दक्षता घेणे खूप महत्वाचे आहे.
सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 6 हजारांवर
सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 6133 वर पोहोचली आहे.
केरळ सर्वाधिक संक्रमित राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, केरळमध्ये सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या 1806 आहे.
त्यानंतर गुजरात (717), दिल्ली (665), महाराष्ट्र (577) आणि कर्नाटक (444) अशी राज्ये आहेत.
8 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षी 1 जानेवारीपासून एकूण 5484 रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?
- खोकताना व शिंकताना रूमालाचा वापर करावा.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणे इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.
- अशा प्रकारची लक्षणे, इतर आजाराने व्याधीग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
काय आहेत कोरोनाची लक्षणे
- घसा खवखवणे
- थकवा
- सौम्य खोकला
- ताप
- नाक बंद होणे
- डोकेदुखी
- मळमळ
- भूक न लागणे
- गॅस्ट्रोइंटेस्टाइनल बिघाड
- विशेषतः चव किंवा वास कमी होणे
हा व्हेरीयंट किती आहे संसर्गजन्य?
चीनमधील आकडेवारीनुसार, NB.1.8.1 प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता इतर ओमिक्रॉन उप-प्रकारांपेक्षा जास्त आढळून आलेली नाही.
कोरोनाला असे रोखू शकता
1. स्वच्छता - साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा (किमान 20 सेकंद)
साठ टक्के अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरा.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.
2. मास्क - सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी नेहमी मास्क घाला.
सर्जिकल मास्क किंवा N95 मास्क चांगले संरक्षण प्रदान करतात.
3. सामाजिक अंतर राखा - इतरांपासून कमीत कमी 6 फूट अंतर ठेवा.
विशेषतः खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या लोकांपासून थोडे लांबच राहीलेले बरे. आजारी वाटत असल्यास घरीच रहा.
4. डाॅक्टरांचा सल्ला - जर तुम्हाला सौम्य लक्षणे (उदा. ताप, खोकला, थकवा) जाणवत असतील तर स्वतःला घरी वेगळे करा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5. लसीकरण - कोविड-19 चे सर्व डोस (बूस्टरसह) वेळेवर घ्या. ही लस संसर्गाची तीव्रता कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
6. खोकला आणि शिंकताना सावधगिरी - खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा कोपर वापरा. वापरलेले टिशू ताबडतोब कचऱ्याच्या डब्यात टाका.
7. आरोग्य विभागाच्या सूचना - सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आरोग्य मंत्रालय किंवा WHO ने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा.












Click it and Unblock the Notifications