Coronavirus देशात कोविड-19 चे 1001 सक्रीय रुग्ण; कोरोनामुळे एवढ्या जणांचा मृत्यू! राज्यात स्थिती काय
Coronavirus JN-1 Variant Over 1001 active cases in India 7 death : देशात कोविड -19 विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात खासकरुन कोरोना व्हायरसचा संसर्ग दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरील ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाचे नवे 1001 सक्रीय रुग्ण आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर काही राज्यांमध्ये कोविडचा संसर्ग दिसून येत आहे. तर या संबंधित मृत्यूची नोंदही झाली आहे. केंद्र सरकार तथा संबंधित राज्यांचे सरकार कोरोना संसर्गासंबंधी बारकाईने नजर ठेवून असून योग्य उपाय योजले जात आहे.

भारतातील सक्रिय रुग्ण
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरील सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतात एक हजार एक सक्रिय रुग्ण आहेत. नोएडा येथील एका 55 वर्षीय महिलेला कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळले. उत्तर प्रदेशातील नोएडामधील हा पहिलाच रुग्ण आहे.
महाराष्ट्र कोविड रुग्णांची संख्या किती?
महाराष्ट्रात कालपर्यंत 154 सक्रीय रुग्ण होते आज ताजी आकडेवारी येणे बाकी आहे. महाराष्ट्रात नुकतेच एका 21 वर्षीय तरुणाचा कोविडमुळे मृत्यू झाला. दरम्यान आता महाराष्ट्रातील मृतांची संख्या 4 वर पोहचली आहे.
केरळ, महाराष्ट्र दिल्ली राजस्थानात रुग्णसंख्या वाढतेय
केरळमध्ये 335 रुग्ण सक्रीय असून येथील रुग्णसंख्येचे प्रमाण चिंताजनक आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात 34 रुग्ण सक्रीय आहेत आणि दिल्लीत 104 रुग्ण आहेत, राजस्थानमधील जयपूर येथील एका 26 वर्षीय तरुणाचा COVID -19 विषाणूमुळे मृत्यू झाला. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने 26 मे (सोमवार) रोजी या मृत्यूची पुष्टी केली. तर 26 मे रोजी राजस्थानमध्ये 8 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या 23 झाली आहे.
केरळमध्ये 2,कर्नाटकात 1 अन् महाराष्ट्रात 4, मृत्यू
कोरोना संसर्गामुळे केरळमध्ये 2,कर्नाटकात 1 अन् महाराष्ट्रात 4, मृत्यू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 चे केरळमध्ये 430, महाराष्ट्रात 210 आणि दिल्लीत 104 सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
कोरोनापासून संरक्षण कसे करायचे?
- मास्कचा वापर नेहमी योग्य पद्धतीने करावा, मास्कने नेहमीच नाक आणि तोंड झाकले गेले पाहिजे.
- जिथे शक्य असेल तिथे नेहमीच सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखावे.
- हात साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार आणि स्वच्छ धुवावेत
- साबणाने न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता हाताने नाक/डोळे/तोंडाला स्पर्श करणे टाळा.
- योग्य श्वसन स्वच्छता राखा.
- वारंवार साफ केलेले पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ आणि निर्जतुक करा,
- खोकताना किंवा शिंकताना टिश्यूचा वापर करावा आणि वापरलेले टिश्यू कचरापेटीमध्ये टाकावेत. जर, खोकताना किंवा शिकताना एखाद्याकडे टिश्यू पेपर नसल्यास हाताच्या वाकलेल्या कोपराल शिकावे.
- सार्वजनिक ठिकाणी थंकू नये.
- आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
- गर्दी टाळा आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) ठेवा.
- एकमेकांना भेटताना हस्तांदोलन टाळा व सुरक्षीत अंतर राखूनच नमस्कार करा.












Click it and Unblock the Notifications