अदानी कुटुंबाने केली 'अदाणी हेल्थ सिटी'ची घोषणा, मुंबई- अहमदाबादमध्ये होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
सेवा हिच साधना,सेवा हिच प्रार्थना आणि सेवा हाच परमात्मा या उक्तीने प्रेरीत होऊन अदानी समुहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अदाणी समूहाचे अदाणी हेल्थ सिटी (AHC) एकात्मिक आरोग्य कॅम्पस सुरू करण्याची घोषणा केली. अदाणी हेल्थ सिटीची निर्मिती अदाणी ग्रुपच्या नॉन-फॉर-प्रॉफिट हेल्थकेअर शाखाद्वारे केली जाईल, असे गौतम अदानी यांनी सांगितले. त्यासाठी अदाणी समूहाने यासाठी जगातील सर्वात मोठ्या 'मेयो क्लिनिक'शी हातमिळवणी केली आहे. त्यातूनच आता मुंबई आणि अहमदाबाद येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

दोन शहरांत हाँस्पिटल
अदानी हेल्थ सिटीकडून मुंबई व अहमदाबाद येथे सुपर स्पेशलिटी हाँस्पीटल उभारले जाणार आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयही उभे केले जाणार आहे. या रुग्णालयात 1000 खाटांची सोय उपलब्ध असेल. तेथे सामान्यांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळतील, असे अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी जाहीर केले. अदाणी कुटुंब देशभरातील सर्वसामान्यांना परवडणारी जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय शिक्षण देण्याचा पूर्ण खर्च करेल, असे गौतम अदानी यांनी सांगितले.
Proud to launch Adani Health City in partnership with Mayo Clinic, pioneering world-class medical research, affordable healthcare & education. Starting with two 1000-bed hospitals and medical colleges in Ahmedabad & Mumbai, we are on a mission to bring cutting-edge medical… pic.twitter.com/KQ6Xoql3FH
— Gautam Adani (@gautam_adani) February 10, 2025
6,000 कोटींची देणगी
मुंबई आणि अहमदाबादमध्ये दोन आरोग्य कॅम्पस बांधण्यासाठी अदाणी कुटुंबाकडून 6,000 कोटींपेक्षा जास्त देणगी देण्यात येणार आहे. या दोन शहरांखेरीज देशातील शहरे आणि गावांमध्येही अशा प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे गौतम अदानी यांनी स्पष्ट केले. प्रत्येक एकात्मिक AHC कॅम्पसमध्ये 1,000 खाटांचे मल्टी-सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल देण्यात येईल. शिवाय तेथील वैद्यकीय महाविद्यालयात 150 अंडरग्रेजुएट्स, 80 पेक्षा जास्त रहिवासी विद्यार्थी आणि 40 पेक्षा जास्त फेलो, स्टेप-डाउन आणि ट्रान्सिशनल केअर सुविधा आणि अत्याधुनिक संशोधन सुविधा असतील.
वैद्यकीय महाविद्यालयेही काढणार
AHC वैद्यकीय महाविद्यालयेही सुरु करणार आहेत. सर्व स्थरांतील लोकांना सेवा देणे व सर्व समाजातील सामान्यांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठी हा उपक्रम राबवविला जाणार असल्याचे अदानी समुहाकडून सांगण्यात आले. अदाणी समूह अमेरिकेतील मेयो क्लिनिक ग्लोबल कन्सल्टिंग (मेयो क्लिनिक) च्या सहकार्यानं ही योजना आमलात आणणार आहे. मेयो क्लिनिक डिजिटल आणि माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या एकत्रिकरणावर त्यामधील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
प्रत्येकाला आरोग्यसेवा
या उपक्रमाबाबत बोलताना अदानी यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी, माझ्या 60 व्या वाढदिवशी मला भेट म्हणून, माझ्या कुटुंबाने आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासात सुधारणा करण्यासाठी 60,000 कोटी देण्याचं वचन दिलं होतं. याच पैशातून अदानी हेल्थ सिटीचा हा उपक्रम राबवविला जाणार आहे. स्वप्नातील अनेक प्रकल्पांपैकी हा पहिला प्रकल्प आहे. प्रत्येक घटकातील लोकांना परवडणारी, जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याच्या दिशेने आमचे हे पहिले पाऊल आहे. मेयो क्लिलिकसोबतच्या गंभीर रोगांवरील उपचार करणे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील नवी संशोधने करणे यास यामुळे मदत होईल, असा विश्वास अदाणी यांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications