Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला 'विश्वासघात'केला का? म्हणतेय 'देखा जी देखा मैने दिल का रोना देखा'

Dhanashree Verma: प्रसिध्द डान्सर धनश्री वर्मा आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. 20 मार्च 2025 रोजी या जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. त्याच दिवशी धनश्रीने टी-सीरीजचा 'देखा जी देख मैंने' हा म्युझिक व्हिडिओ रिलीज केल्याने ती सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आहे.

धनश्री वर्माचे नवीन गाणे रिलीज

धनश्री वर्माचे नवीन व्हिडिओ गाणे चुकीचे नातेसंबंध आणि फसवणूक याबद्दल आहे. या गाण्याच्या रिलीजची वेळ आणि तिच्या अलीकडील इंस्टाग्राम अॅक्टिव्हिटींमुळे नवीन अटकळांना हवा मिळाली आहे.

yuzvendra chahal and dhanashree verma

धनश्री वर्माने तिच्या इंस्टा स्टोरीवर तिच्या नवीन गाण्याचा रील पुन्हा शेअर केला आहे, जिथे एका चाहत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - 'जिंदगी कला की नकल करती है'. धनश्रीच्या या गूढ पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वेदनादायक कथानकाचे चित्रण करून ती स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष वेधत आहे का?

व्हिडिओमध्ये प्रेमात झालेल्या फसवणुकची झलक

टी-सीरीजने रिलीज केलेल्या या गाण्यात पाताल लोक फेम इश्वाक सिंग आणि धनश्री वर्मा दिसत आहेत. या गाण्याचे बोल 'देखा जी देखा मैने दिल का रोना देखा, गैरो के बिस्तर पे अपनो का सोना देखा' असे असून प्रेमात झालेल्या फसवणुकीवर आधारित हे गाणे आहे.. धनश्री वर्मा यांनी स्वतः सांगितले होते की, तिचा या प्रॉजेक्टमध्ये किती महत्वाचा सहभाग आहे. तीनं म्हटलं होत की- हे मी आतापर्यंत केलेल्या सर्वात भावनिक गाण्यांपैकी एक होते. त्यासाठी खूप संयम आवश्यक होता आणि मला आशा आहे की हे गाणं प्रेक्षकांना पसंद पडेल.

धनश्री वर्माचा जबरदस्त डान्स

या नवीन व्हिडिओ गाण्यात धनश्री वर्माने एक जबरदस्त डान्स केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे गाणे ज्योती नूरन यांनी गायले आहे आणि त्याचे बोल जानी यांनी लिहिले आहेत.

घटस्फोटाच्या दिवशी भावनिक गाणे शेअर केले

या नवीन व्हिडिओ गाण्यात धनश्री वर्मा रडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत लोक त्याच्या नवीन गाण्याला घटस्फोटाशी जोडत आहेत. लोकांच म्हणणं आहे की, घटस्फोटाचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच धनश्री वर्माने हे गाणे यूट्यूबवर शेअर केले आहे. या गाण्यावर लोक जबरदस्त कमेंट्स देत आहेत. काही लोकांच्या मते, धनश्री वर्माने घटस्फोटाच्या दिवशी हे गाणे जाणूनबुजून रिलीज केलं असल्याचं म्हटलं आहे.

धनश्री वर्माला इतकी पोटगी मिळाली

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचे डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले होते. आणि लग्नाच्या 5 वर्षानंतर म्हणजे 20 मार्च 2025 रोजी दोघांचा घटस्फोट झाला. बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल त्याची माजी पत्नी धनश्री वर्मा हिला 4.75 कोटी रुपयांची पोटगी देण्यास तयार आहे. त्याने धनश्रीला आधीच 2.37 कोटी रुपये दिल्याचे वृत्त आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+