Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ब्रेकअप्सने गाजले बॉलिवूड ते क्रिकेटचे जग! 'या' वर्षात 'एवढ्या' सेलिब्रिटींचे ब्रेकअप्स अन् घटस्फोट!

Celebrity Breakups and Divorces : बॉक्स ऑफिसवर मोठे हिट्स देणाऱ्या मनोरंजन क्षेत्रासाठी, २०२५ हे वर्ष नात्यांच्या दुनियेतील मोठे धक्के घेऊन आले. बॉलिवूड, टीव्ही आणि क्रिकेट जगतातील अनेक चमकत्या जोड्यांची नाती यावर्षी तुटली. करिअरमध्ये यश मिळवत असतानाच, वैयक्तिक आयुष्यात अनेक सेलिब्रिटींना प्रेम आणि विश्वासाची कसोटी पार करावी लागली. जाणून घेऊया २०२५ मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले ब्रेकअप्स आणि घटस्फोटाच्या आठ कहाण्या.

Celebrity Breakups and Divorces

२०२५ मध्ये तुटलेली ८ सेलिब्रिटी नाती

या वर्षात चर्चेत राहिलेल्या ब्रेकअप्स आणि घटस्फोटांची यादी

१. क्रिकेट आणि डान्सचा ब्रेकअप

युजवेंद्र चहल - धनश्री वर्मा: वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. महिन्याभराच्या चर्चांना या निर्णयाने पूर्णविराम मिळाला.

२. ऐनवेळी तुटलेले 'एंगेजमेंट'

स्मृती मानधना - पलाश मुच्छल: भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या ब्रेकअपची बातमी सर्वात धक्कादायक ठरली. मीडिया रिपोर्टनुसार, विवाहाच्या काही तास आधीच स्मृतीने पलाशशी असलेले नाते तोडले.

३. बॉलिवूडमधील 'विश्वासघात'

तमन्ना भाटिया - विजय वर्मा: बॉलिवूडमधील ही चर्चित जोडीही २०२५ मध्ये वेगळी झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'विश्वासाच्या कमतरतेमुळे' दोघांचे नाते संपुष्टात आले. मात्र, याबाबत दोघांनीही सार्वजनिकरित्या कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

४. अत्याचाराचे गंभीर आरोप

सेलिना जेटली - पीटर हाग: अभिनेत्री सेलिना जेटलीने पती पीटर हागविरुद्ध घटस्फोटाची याचिका दाखल करून इंडस्ट्रीला हादरवून सोडले. सेलिनाने पीटरवर शारीरिक छळ, मानसिक त्रास आणि मालमत्ता हडपल्याचे गंभीर आरोप केले आहेत. हा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

५. दक्षिण इंडस्ट्रीतील तिसरा घटस्फोट

मीरा वासुदेवन - विपिन पुथियांकम: साऊथ अभिनेत्री मीरा वासुदेवनने नोव्हेंबर २०२५ मध्ये तिसऱ्या पतीपासून घटस्फोटाची पुष्टी केली. हा अनुभव तिच्यासाठी भावनिक आणि अत्यंत आव्हानात्मक असल्याचे तिने सांगितले.

६. १२ वर्षांचे नाते संपुष्टात

जी. व्ही. प्रकाश कुमार - सैंधवी: संगीतकार आणि अभिनेता जी. व्ही. प्रकाश कुमार आणि गायिका सैंधवी यांच्या १२ वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा अंत झाला. दोघांनी २४ मार्च २०२५ रोजी चेन्नई फॅमिली कोर्टात आपापसात सहमतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.

७. घटस्फोटानंतर पतीचे निधन

शुभांगी अत्रे - पीयूष पुरी: 'भाभीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेला फेब्रुवारी २०२५ मध्ये पती पीयूष पुरी यांच्याकडून घटस्फोट मिळाला. समेट घडवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. दुर्दैवाने, घटस्फोटानंतर काही महिन्यांनी पीयूष पुरी यांचे निधन झाले.

८. सन्मानपूर्वक वेगळे झालेले टीव्ही कपल

संजीव सेठ - लता सभरवाल: 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील हे लोकप्रिय टीव्ही कपल जून २०२५ मध्ये अधिकृतपणे वेगळे झाले. सोशल मीडियावर निवेदन जारी करून त्यांनी सन्मानपूर्वक विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+