ती बेभानपणे नाचत राहिली अन् पोलीस बघतचं राहीले, व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कुठल्याही हद्दीपर्यंत जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अलीकडेच एका महिलेने, रस्त्यावरसुद्धा थेट पोलिसांसमोर डान्स करत रील बनवली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये महिला निर्भयपणे पोलिसांसमोर डान्स करताना दिसते, तर पोलीस फक्त बघ्याची भूमिका निभावताना दिसून आले. या घटनेबाबत नेमकी जागा किंवा दिवशीची माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये चर्चा आणि टीकेचा विषय ठरला आहे.
नेटकरी नाराज
- काहींनी या कृत्याला पोलिसांचा अपमान म्हटले.
- काहींनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
- "पोलीस ड्युटीवर असताना अशा प्रकारची रील बनवणं अपमानजनक आहे" अशाही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
- अशी कृती करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
हा व्हिडिओ ट्विटरवरील @Vtxt21 या खात्यावरून शेअर करण्यात आला असून अनेकांनी तिच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला आहे. काहींनी भटक्या कुत्र्यांना पकडण्यापेक्षा अशा रीलस्टारना पकडावं, असा सल्ला दिला आहे.
Leave stray dogs, arrest these Reelers 🤣 #SupremeCourt
— V🐧 (@Vtxt21) August 22, 2025
pic.twitter.com/EXWVmeFIY8
पोलिसांच्या प्रतिमेला धक्का
या सर्व प्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शांततेची जबाबदारी जपणारे पोलिस अशा किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या अपमानास्पद घटनांबाबत अधिक सक्रिय व्हावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून ठेवली जात आहे.












Click it and Unblock the Notifications