लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा मुस्लिम होणार ? सासऱ्यांनी केलं मोठं विधान
Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्ती चर्चेत आहे. 23 जून 2024 रोजी सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न करणार असल्याची माहिती आहे.

सध्या या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू आहेत. काल सोनाक्षीनेही तिच्या हातावर झहीरच्या नावाची मेहंदी लावली होती.
झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचा विवाह:
मुस्लिम अभिनेता झहीर इक्बालच्या लग्नाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या लग्नासाठी सोनाक्षी सिन्हा हिंदू धर्म सोडून मुस्लिम होणार आहे का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. याच कारणामुळे सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा, तिची आई पूनम सिन्हा आणि भाऊ लव हे लग्न स्वीकारू शकत नाहीत.
लग्नानंतर सोनाक्षी मुस्लिम होणार का?
अभिनेता जहीर इकबाल हा प्रसिद्ध उद्योगपती इकबाल रतनसी यांचा मुलगा आहे. इक्बाल रतनसी हा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा खूप चांगला मित्र आहे. फादर्स डेच्या निमित्ताने सोनाक्षी तिच्या सासऱ्यांसोबत सेलिब्रेशन करताना दिसली, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सासरे इकबाल रतनसीचे मोठं विधान:
लग्नापूर्वी इक्बाल रतनसीने फ्री प्रेस जर्नलशी आपली भावी सून सोनाक्षी सिन्हा बद्दल खुलेपणाने बोलले. यावेळी त्यांनी सोनाक्षीच्या धर्मांतराच्या अफवांवरही मोठे विधान केले आहे. इक्बाल रतनसी म्हणाले - सोनाक्षी तिचा धर्म बदलणार नाही. कारण इथे दोघांची भेट हीच हृदयाची भेट आहे. यात धर्माची भूमिका नाही.
सोनाक्षी झहीरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते.
इकबाल रतनसी पुढे बोलताना म्हणाले की,हिंदू भले ही भगवान म्हणू शकतात आणि मुस्लिम अल्लाह म्हणू शकतात. परंतू आपण शेवटी सर्व एक माणसं आहोत.माझे आशीर्वाद झहीर आणि सोनाक्षीला आहेत. ते दोघे सदैव आनंदी राहोत. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोनाक्षी गेल्या एक वर्षापासून झहीरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
23 जून 2024 रोजी सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शन पार्टी
लग्नाबाबत सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले - मी आणि माझी पत्नी पूनम 23 जून 2024 रोजी होणाऱ्या सेलिब्रेशनचा नक्कीच भाग असू. सोनाक्षीचे लग्न २३ जूनला नाही. हे फक्त लग्नाचे रिसेप्शन आहे, ज्यात आपण सगळे एकत्र दिसणार आहोत. माझ्या कुटुंबातील कोणीही लग्नाबद्दल काहीही बोलले नाही.












Click it and Unblock the Notifications