Adnan Sami: गायक अदनान सामीला पाकिस्तानला जावे लागणार की भारतातच राहणार? जाणून घ्या त्याची लव्ह लाईफ
Will singer Adnan Sami be sent to Pakistan or will he stay in India : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यात सुमारे सव्वीस भारतीयांचा बळी दहशवाद्यांनी घेतला. या हिंसक घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक धोरण राबवण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांत देश सोडण्यास सांगितले होते.
दरम्यान पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले तर काही विशिष्ट क्षेत्रातील व्यक्तींना 29 एप्रिलच्या आत देश सोडण्यास सांगितले होते, अशातच आता सोशल मीडियावर एक पोस्ट अशी आली की, त्यामुळे पाकिस्तानी गायक आणि आता भारतात वास्तव्य करणारा प्रसिद्ध गायक अदनान सामी याच्याकडे सर्वांच्या नजरा वळाल्या आहेत.

अदनान सामी अचानक का प्रसिद्ध झाला?
अलिकडेच अदनान सामीने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने सांगितले की काही पाकिस्तानी तरुणांनी त्याला असे म्हटले की "तू भाग्यवान आहेस की तू योग्य वेळी पाकिस्तान सोडलेस." या पोस्टमुळे आता अदनान सामी परत चर्चेत आला आहे आणि लोक त्याच्या मुळ नागरिकतेबद्दल आणि जुन्या आयुष्याबद्दल तसेच पुर्वीच्या पत्नींबद्दल माहिती जाणून घेत आहेत.
अदनान सामीला भारत सोडून जावे लागेल का?
पाकिस्तानात जन्म झालेला अदनान सामी जन्माने पाकिस्तानी जरी असला तरीही त्याने भारतात आपले करीअर वाढवले आहे. व्हिजावर तो भारतात राहत होता अशावेळी 2015 मध्ये जेव्हा त्याचा पाकिस्तानी पासपोर्ट संपला तेव्हा त्याने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला. 1 जानेवारी 2016६ पासून तो अधिकृतपणे भारतीय झाला आहे. त्यामुळे आता भारत सरकारने जो आदेश नुकताच जारी केला होता तो त्याला लागू नाही कारण त्याने आता भारतीय नागरिकत्व पत्करलेले आहे.
भारताबद्दल काय म्हणतो अदनान सामी?
पूर्णपणे संगीतावर आणि कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करणारा अदनान सामी भारताबद्दल म्हणतो की, "जिथे मला पाकिस्तानात द्वेष मिळाला, तिथे मला भारतात प्रेम आणि मान्यता मिळाली"
अदनान सामीच्या पत्नी आणि घटस्फोटाबद्दल
अदनानची पहिली पत्नी पाकिस्तानी सुंदरी 'झेबा बख्तियार' (1993-1997)
90 च्या दशकात अदनान सामीने प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियारशी लग्न केले. हे झेबाचे तिसरे लग्न होते आणि या नात्यातून त्यांना एक मुलगा झाला - अझान सामी खान. पण हे प्रेम जास्त काळ टिकले नाही आणि चार वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.
'सबा गलादरी' अदनानची दुसरी अन् तिसरी पत्नी (2001-2004, 2008-2009)
अदनान सामीने 2001 मध्ये दुबईतील व्यावसायिक सबा गलादरीशी लग्न केले. 2004 मध्ये हे नाते तुटले. पण प्रकरण इथेच संपले नाही - दोघांनी 2008 मध्ये पुन्हा लग्न केले, परंतु एका वर्षाच्या आतच त्यांचा पुन्हा घटस्फोट झाला. म्हणजे एकाच पत्नीशी दोनदा लग्न करणे आणि दोन्ही वेळा ब्रेकअप झाले.












Click it and Unblock the Notifications