Malaika Arora : मलायका अरोराविरोधात वॉरंट का निघाला?, नेमकं प्रकरण कायं?, जाणून घ्या सविस्तर
Malaika Arora : मुंबई स्थानिक न्यायालयाने मलायका अरोराविरुद्ध पुन्हा एकदा जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण सैफ अली खानशी संबंधित आहे. खरंतर, १३ वर्षांपूर्वी, सैफअली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर मुंबईतील एका ५ स्टार हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका व्यावसायिकावर आणि त्याच्या सासऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. त्यावेळी मलायका देखील सैफसोबत उपस्थित होती, परंतु ती साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर झाली नाही.
मलायका अरोरा विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी
मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाचे एस झंवर या प्रकरणाचा तपास करत आहेत. १५ फेब्रुवारी रोजी मलायका अरोराविरुद्ध न्यायालयाने प्रथम जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सोमवारी ती न्यायालयात हजर न राहिल्याने पुन्हा वॉरंट जारी करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होईल.

२०१२ च्या घटनेत मलायकाचे नाव
ही घटना २२ फेब्रुवारी २०१२ रोजी घडली. सैफ अली खान त्याची पत्नी करीना कपूर खान, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि इतर अनेक पुरुष मित्रांसह उपस्थित होता. सर्वजण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेले.
सैफसह अनेक लोकांची नावे समाविष्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा शर्माने सैफअली खान आणि त्याच्या मित्रांच्या मोठ्याने बोलण्यावर आक्षेप घेतला तेव्हा सैफ अली खानने त्याला धमकावले आणि त्याच्या नाकावर ठोसा मारला, ज्यामुळे त्याचे नाक फ्रॅक्चर झाले. एनआरआय व्यावसायिकाने सैफ आणि सैफच्या मित्रांवर त्याच्यावर आणि त्याचे सासरे रमन पटेलवर हल्ला केल्याचा आरोप केला होता.
सैफनेही केले आरोप
दरम्यान, सैफने असा दावा केला होता की इक्बालने त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या महिलांवर अश्लील कमेंट केल्या होत्या, ज्यामुळे हाणामारी झाली. या प्रकरणात पोलिसांनी २१ मार्च २०१२ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. ज्याअंतर्गत सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ (जाणीवपूर्वक गंभीर दुखापत करणे) आणि कलम ३४ (हल्ला) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications