कोण होती 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवाला? फिल्मी करीअर, टीव्ही शो अन् कशामुळे झाला मृत्यू? वाचा
Who was Kaanta Laga fame actress Shefali Jariwala : बिग बाॅस फेम शेफाली जरीवाला हिचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज २८ जून २०२५ रोजी पहाटे तिच्या मृत्यूसंदर्भात अधिकृतरित्या माहिती देण्यात आली. या घटनेने बाॅलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. तिचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.
शेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिच्याबद्दल अनेकजण जाणून घेत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, शेफाली जरीवाला हिचे दोन लग्न झाली होती. पहिल्या लग्नानंतर तिने पराग त्यागी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. त्यागी यांच्यासोबत ती खूपच आनंदाने राहत होती आणि सोशल मीडियावर आपले अनमोल क्षणही शेअर करत होती. चला जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल...

शेफाली जरीवाला कोण होती?
- शेफाली जरीवाला हिचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी मुंबईत झाला होता. तिचा मृत्यू २७ जून २०२५ रोजी वयाच्या ४२व्या वर्षी झाला.
- तिचे शिक्षण अल्मा मेटर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे झाले होते.
- व्यवसायाने शेफाली एक मॉडेल आणि अभिनेत्री होती.
- अभिनेत्री म्हणून ती २००२ ते २०२५ या काळात सक्रीय राहीली.
शेफाली जारीवालाचे दोन विवाह
शेफाली जरीवाला हिने मीट ब्रदर्सचे संगितकार हरमीत सिंग यांच्यासोबत २००४ मध्ये लग्न केले होते. २००९ मध्ये शेफालीने हरमीतवर आरोप केले तेव्हा या जोडप्याचा घटस्फोट झाला. नंतर, तिने २०१५ मध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफाली जरीवाला ही संगणक पदवीधर होती.
शेफाली जारीवालाची अभिनेत्री म्हणून कारकिर्द
शेफाली जरीवाला ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिने अनेक हिंदी संगीत व्हिडिओ, रिअॅलिटी शो आणि टेलिव्हिजन शो केले. ती कांटालगा या म्युझिक व्हिडिओसाठी ओळखली जाते. तिने पराग त्यागीसोबत नच बलिये 5 आणि नच बलिये 7 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.
बिगबाॅसमध्ये एंट्री
शेफाली जरीवाला हिने २०१९ मध्ये तिने बिग बॉस १३ मध्ये भाग घेतला होता. २०१८ मध्ये तिने बाॅलीवूडचा मराठी अभिनेता श्रेयस तळपदेसोबत एएलटी बालाजीच्या बेबी कम ना या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
शेफाली जारीवाला आरोग्यावर उघड बोलली
विकीपीडियानुसार, ई टाईम्स टीव्हीशी बोलताना शेफाली तिच्या आरोग्यासंदर्भात मोकळेपणाने बोलली. तिने खुलासा केला होता की, तिला १५ वर्षांची असताना पहिला अपस्माराचा झटका आला होता आणि तिला ताणतणाव आणि चिंतेमुळे झटके येत असत, परंतु नियमित व्यायामामुळे आणि नैराश्याशी लढण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला झटके येत नव्हते.
करिअर
टेलिव्हिजन
२००२ च्या कांता लगा या व्हिडिओ अल्बममधील गाण्यात दिसल्यानंतर शेफाली प्रसिद्धीच्या झोतात आली.
शेफाली तिच्या एका म्युझिक अल्बममुळे कांटा लगा गर्ल नावाने प्रसिद्ध झाली होती.
डान्स, शो
- 2008 - बूगी वूगी स्पर्धक
- 2012-2013 - नच बलिये 5
- 2015-2016 - नच बलिये 7
- 2019-2020 - बिग बॉस 13
चित्रपट
- 2004 - मुझे शादी करोगी बिजली हिंदी
- 2011 -हुदुगारू पंकजा कन्नड
वेब सिरीज
- 2018 - बेबी आओ ना सारा
म्युझिक अल्बम
- 2024 शैतानी रस्में
- 2002 - डीजे डॉल - कांटा लगा
- 2004 - मीठा हनी मिक्स कभी आर कभी पर
- डिजे डॉल आणि द रिटर्न ऑफ द कांटा मिक्स व्हॉल 2 कांटा लगा डीजे डॉल












Click it and Unblock the Notifications