राज ठाकरेंशी मैत्रीच्या चर्चेत सोनाली बेंद्रेचे पती कोण? 4 वर्षांची मैत्री, पार्टीत प्रपोज नंतर लग्न
Who is Sonali Bendre's husband : सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिलखेचक अदांनी घायाळ करणारी सुंदर नटी म्हणजे सोनाली बेंद्रे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा मराठी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर या दोघांच्या जुन्या नात्याचा उजाळा आणि चर्चा खूप रंगली. माध्यमांतच नाही तर सोशल मीडियावरही लोकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या. हे जरी असले तरी सोनाली बेंद्रेने खुलासा केला. त्यानंतर आता या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पती कोण याची उत्सुकता लोकांना आहे.

कोण आहे सोनाली बेंद्रेचे पती
आम्ही सांगतो की, गोल्डी बहल हे सोनाली बेंद्रे यांचे पती आहे. गोल्डी बहल हे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. त्यांचा जन्म १९७५ मध्ये मुंबईत झाला. गोल्डी यांचे वडील रमेश बहल हे देखील चित्रपट उद्योगाशी संबंधित होते, ज्यांच्याकडून गोल्डीला चित्रपट निर्मितीचा वारसा आणि सखोल अनुभव मिळाला आहे.
गोल्डी बहल यांचे चित्रपट कोणते
गोल्डी बहलचे बॉलिवूडशी खास नाते आहे तर दुसरीकडे वडीलांचा वारसाही आहे. प्राप्त माहितीनुसार, गोल्डी बहल यांनी १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंगारे' चित्रपटाच्या निर्माता म्हणून स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बस इतना सा ख्वाब है' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी दिसले होते. गोल्डी बहल एक निर्माता आणि दिग्दर्शक आहे तर त्यांनी 'द्रोण' (२००८) हा चित्रपट देखील दिग्दर्शित केला. 'कहने को हमसफर हैं', 'रिजेक्ट्स' आणि 'दुरंगा' सारख्या वेब सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे.
गोल्डी बहल आणि सोनाली बेंद्रेंची प्रेमकथा, लग्न
मिडिया रिपोर्टनुसार, गोल्डी बहल आणि सोनाली बेंद्रे पहिल्यांदा 'नाराज' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. चार वर्षांच्या मैत्रीनंतर गोल्डी यांनी सोनालीला एका पार्टीत प्रपोज केले आणि ते तिने स्वीकारले. त्यानंतर, १२ नोव्हेंबर २००२ रोजी दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले. या लग्नाला अनेक मोठे बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. २००५ मध्ये या जोडप्याचा मुलगा रणवीरचा जन्म झाला. गोल्डी बहल आणि सोनाली बेंद्रे यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात मजबूत जोडप्यांपैकी एक मानली जाते.
सोनालीच्या कठिण काळात पती बनला आधारस्तंभ
२०१८ मध्ये सोनाली बेंद्रेला मेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान झाले होते. ती या गंभीर आजाराच्या चौथ्या टप्प्यात होती. त्यानंतर तिने कामापासून ब्रेक घेतला आणि कर्करोगाच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला गेली. या कठिण काळात सोनाली बेंद्रेने मुंबई तसेच बॉलिवूडपासून स्वतःला दूर ठेवले. २०२१ मध्ये ती बरी झाल्यानंतर भारतात परतली. या मोठ्या लढाईत तिचा पती गोल्डी बहल यांनी तिची काळजी घेतली. तो पत्नी सोनालीसोबत एका भक्कम आधारासारखा उभा राहिला.
- गोल्डी बहल किती संपत्तीचे मालक
- काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की गोल्डी बहल यांच्याकडे सुमारे २५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
- त्यांच्याकडे ऑडी A6 आणि BMW सारख्या आलिशान गाड्या आहेत.
- गोल्डी बहल त्याच्या कुटुंबासह मुंबईतील जुहू परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात. त्याची बहीण, सृष्टी आर्य, ही देखील एक प्रसिद्ध टीव्ही शो निर्माती आहे.
- दोन्ही भावंडांनी मिळून 'रोज ऑडिओव्हिज्युअल्स प्रायव्हेट लिमिटेड' ची स्थापना केली आहे.
सोनाली बेंद्रेची एकूण संपत्ती किती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाली बेंद्रेची एकूण संपत्ती २५० कोटींपेक्षा जास्त आहे. तिने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त, ती एक यशस्वी मॉडेल आणि व्यावसायिक महिला देखील आहे. सोनाली बेंद्रेची कमाई चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि तिच्या व्यवसायातून येते.












Click it and Unblock the Notifications