Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'ही' गायिका आहे 1.77 लाख कोटींची मालकीन; सौंदर्य असं की अभिनेत्रीही फेल, कोण आहे अनन्या बिर्ला? वाचा

बॉलिवूडमध्ये असे अनेक गायक आहेत ज्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले. पण बॉलिवूडबाहेर अशी एक गायिका आहे, जी मुळातच गर्भश्रीमंत आहे. तिने आत्तापर्यंत ४९ गाण्यांमध्ये आपल्या मधुर आवाजाची जादू दाखवली आहे. या गायिकेची एकूण संपत्ती १.७७ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. एवढेच नाही, तर या गायिकेच्या ग्लॅमरसमोर बॉलिवूडच्या सुंदरीही फेल ठरतातहेत. या गायिकेचे नाव आहे अनन्या बिर्ला.

Who is Ananya Birla

कोण आहे अनन्या बिर्ला?

देशातील १० सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेल्या बिर्ला कुटुंबात अनन्याचा जन्म झाला. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या हिला गायनाची आवड आहे. आपल्या याच आवडीसाठी अनन्या बिर्ला आपले शिक्षण अर्धवट सोडून ऑक्सफर्ड विद्यापीठातून परत आली. १७ जुलै १९९४ रोजी जन्मलेल्या अनन्या बिर्ला यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वयाच्या ११ व्या वर्षापासून संगीत शिकण्यास सुरुवात करणाऱ्या अनन्या बिर्ला यांनी मुंबईतून शालेय शिक्षण पूर्ण केले.

गायलीत सुमारे ५० गाणी

अनन्या भारतात परतली आणि संगीत क्षेत्रात काम करू लागली. अनन्याचे पहिले गाणे 'लिव्हिंग द लाईफ' रिलीज झाले आणि काही लोकांना ते खूप आवडले. अनन्या सतत तिच्या संगीतावर काम करत राहिली आणि गाणी गात राहिली. आतापर्यंत अनन्याने तिच्या मधुर आवाजाने ४९ गाणी गायली आहेत. एवढेच नाही तर अनन्याने अनेक संगीत मैफिलींमध्येही आपली प्रतिभा दाखवली आहे. अनन्याची गाणी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आता अनन्या एक स्थापित गायिका बनली आहे.

अनन्या दिसायला आहे सुंदर

अनन्या एक उत्तम गायिका आहे आणि तिने अनेक परदेशी कलाकारांसोबतही काम केले आहे. अनन्या ही AM:PM संगीत गटासोबत सहयोग करणारी पहिली भारतीय गायिका आहे. यासोबतच तिने परदेशी कलाकारांसोबत अनेक शो देखील केले आहेत. अनन्याने हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. शिवाय, अनन्या ग्लॅमरची राणी आहे आणि खूप सुंदर आहे. अनन्या सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. अनन्याला इंस्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+