शुभमन गिलची बहिण शाहनीलही काही कमी नाही.. सोशल मीडियावर आहेत तीन लाख फाँलोवर्स, पण करते काय?
चॅम्पियन ट्रॅाफी-२०२५ मध्ये भारताकडून पहिलं शतक करणारा, शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मालिकेतला बांगलादेशविरुद्धचा पहिलाच सामना भारताला जिंकून देण्यात शुभमने मोलाची भुमिका पार पाडली होती. सध्या सर्व मीडिया हाऊसमधून शुभमनची संपत्ती, त्याची लाईफ, कुटुंब याच्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र शुभमन जेवढा फेमस आहे, तेवढीच त्याची बहिण शाहनीलही फेमस आहे. तिने सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोण आहे शाहनील? ती काय करते? या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहू...

कोण आहे शाहनील गिल?
काही मिडिया हाऊसच्या म्हणण्याप्रमाणे शुभमन व शाहनील हे जुळे बहिण-भाऊ आहेत. काही मिडिया हाऊस तिला शुभमनपेक्षा अडीच वर्षांनी मोठी असल्याचेही सांगतात. शाहनील ही शुभमनपेक्षा वयाने मोठी आहे, हे मात्र खरे. शाहनीलने लहानपणापासून शुभमनच्या संघर्षात त्याला साथ दिली आहे. शुभमनसोबत ती कायम सावलीसारखी उभी राहिली आहे. आज तो जो काही आहे, त्या यशात तो शाहनीलचा खूप मोठा वाटा असल्याचे अनेकदा बोलूनही दाखवतो. एका जुन्या मुलाखतीत शहनीलने सांगितले की, शुभमन लहानपणी खूप खोडकर होता. तर ती शांत आणि लाजाळू होती. या दोन्ही भावंडांमध्ये खूप घट्ट नाते आहे.
शाहनील काय काम करतो?
शहनील गिल ही सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. ती दिसायला बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. शाहनीलने २०१८-२०१९ पर्यंत रेड रिव्हर कॉलेज पॉलिटेक्निक विनिपेग येथे व्यवसाय प्रशासनात डिप्लोमा केला. मोहाली येथील मानव मंगल स्मार्ट स्कूलमधून तिने शिक्षण घेतले आहे. पुढील शिक्षणासाठी मेहर चंद महाजन चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये होती. यानंतर तिने २०१८-२०१९ मध्ये रेड रिव्हर कॉलेज पॉलिटेक्निक विनिपेगमधून व्यवसाय प्रशासनात डिप्लोमा केला. शाहनीलच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ती आता ऑनलाइन फूड ऑर्डरिंग कंपनी स्किपदडिशेसमध्ये काम करते.
सोशल मीडियावर असते अँक्टीव्ह
व्यावसायिक नोकरी करण्यासोबतच शहनील गिल सोशल मीडियावरही कायम अॅक्टीव्ह असते. शहनील तिच्या बोल्ड लूक आणि उत्कृष्ट ड्रेसेसमुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. तर त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याचे ३६१ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. जेव्हा गिल मैदानावर फलंदाजी करतो तेव्हा कॅमेरामनचे लक्ष त्याची बहीण शाहनील गिलवर असते आणि ती कॅमेऱ्यासमोर येताच तिचे फोटो व्हायरल होतात.












Click it and Unblock the Notifications