Who is Parag Tyagi : कोण आहे पराग त्यागी? शेफाली जरीवालाच्या पतीविषयी सर्वकाही जाणून घ्या
Who is Parag Tyagi : 'बिग बाॅस', 'नच बलिये'ची स्पर्धक आणि 'काटा लगा' फेम शेफाली जरीवाला हिचे मुंबईत निधन झाले. अवघ्या ४२ व्या वर्षी तिला हे जग सोडावे लागले. या घटनेनंतर शेफालीचे पती पराग त्यागी यांना अतीव दुःख झाले. पराग त्यागी यांनीच तिला रुग्णालयात दाखल केले होते परंतु, तिला मृत घोषित करण्यात आले.
विविध टीव्ही शो आणि इतर स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि खासकरुन म्युझिक अल्बममुळे शेफाली जारीवाला ही चर्चेत असायची. तिच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागी यांना रुग्णालयातच अश्रू अनावर झाले होते. पराग त्यागी कोण आहेत हे अनेकांना माहिती नाही, म्हणूनच आज आपण त्यांच्या विषयी जाणून घेऊया.

पराग त्यागी कोण आहेत?
४९ वर्षीय पराग त्यागी हे भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेते आहेत, ते मूळ उत्तर प्रदेशातील मोदीनगरचे आहेत. त्यांनी झी टीव्हीच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून ते 'ब्रह्मराक्षस', 'जोधा अकबर' आणि 'शक्ती - अस्तित्व के एहसास की' सारख्या काही लोकप्रिय शोमध्ये दिसले.
हिट पवित्र रिश्ता मालिकेत दमदार भुमिका
पराग त्यागी यांनी पवित्र रिश्ता या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. पवित्र रिश्ता या मालिकेत पराग त्यागी यांनी विनोद करंजकर नावाने सुलोचना करंजकर (सविता प्रभुणे) यांचा मुलगा आणि अर्चना करंजकर-देशमुख (अंकिता लोखंडे) हिचा भाऊ म्हणून भुमिका साकारली होती.
या मालिका, शोमध्ये सहभाग
- पवित्र रिश्ता - २००९-२०१३
- जोधा अकबर - २०१३
- नच बलिए - २०१२-१३
- कलश - २०१५
- नच बलिये - २०१५
- प्यार को हो जाने दो - २०१५
पराग त्यागी आणि शेफाली जारीवालांचे प्रेम कसे जुळले
पराग त्यागी हे पहिल्यांदा शेफाली जरीवाला यांना एका परस्पर मैत्रिणीच्या डिनर पार्टीत भेटले आणि लगेचच तिच्या प्रेमात पडले. २००९ मध्ये मीट ब्रदर्सच्या संगीतकार हरमीत सिंगशी घटस्फोट झाल्यानंतर, शेफाली सुरुवातीला नवीन नाते निर्माण करण्यास कचरत होती मात्र नंतर जवळजवळ चार वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले.
पराग आणि शेफाली यांनी 'नच बलिये सीझन ५' आणि '७' मध्ये एकत्र भाग घेतला होता, तिथे दोघांमधील केमिस्ट्री चांगली जुळून आली होती. वयाच्या १५ व्या वर्षी शेफालीला अपस्मार झाला होता परंतु उपचारानंतर ती बरी झाली होती, यासंदर्भात खुद्द तिनेच खुलासा केला होता.












Click it and Unblock the Notifications