कोण आहे जेसिका हाईन्स? आमिर खानसोबत 'संबंध' असल्याच्या दाव्याने खळबळ! भाऊ फैसलकडून मोठे आरोप
Who is jessica hines linked to aamir khan : आमिर खानचा भाऊ फैसल खानने खळबळजनक आरोप करत काही दावेही केले आहेत. यामुळे दिग्गज अभिनेता आमिर खान अडचणीत आला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत फैसलखान याने स्वतःचा भाऊ आमिरखान आणि कुटुंबावर आरोप केला आहे. ब्रिटीश पत्रकार आणि लेखिका जेसिका हाईन्ससोबत त्याचे संबंध होते आणि त्यांना एक मुलगा आहे असा आरोप फैसलखानने केला आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ आरोपांमुळे आणि कुटुंबापासून वेगळे होण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. फैसल याने दावा केला आहे की, आमिरचे पहिल्या पत्नी रीना दत्तासोबत लग्न झालेले असतानाही त्याचे जेसिकासोबत संबंध होते आणि त्यांना एक मुलगाही आहे. या आरोपामुळे बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, आमिर खान आणि कुटुंबियांनी फैसलचे आरोप फेटाळत अशा वक्तव्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे आता लोक जेसिका हाईन्स कोण आहेत हे शोधत आहेत.
And Thus British journalist, Jessica Hines became Intolerant & Shri Amir Khan Left her😳😳😳 pic.twitter.com/ufVYiLODN4
— Loose_Bull 🇮🇳 (@loosebool) November 24, 2015
कोण आहेत जेसिका हाइन्स?
- जेसिका एक ब्रिटिश पत्रकार आणि लेखिका आहेत.
- जेसिका हाईन्स 1998 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर पुस्तक लिहिण्यासाठी भारतात आल्या होत्या.
- या काळात आमिर खान 'गुलाम' चित्रपटाचे शूटिंग करत होता, तेव्हा दोघांची काळात भेट झाली होती.
- 2007 मध्ये त्यांचे प्रसिद्ध पुस्तक 'लुकिंग फॉर द बिग बी' प्रकाशित झाले, ज्यामुळे त्या भारतात प्रसिद्ध झाल्या.
आमिर-जेसिकाच्या नात्याची चर्चा
2005 मध्ये जेसिकाने एका ब्रिटिश मॅगझिन 'स्टारडस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत आमिरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल भाष्य केले होते. तेव्हाही त्यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा झाली होती, मात्र आमिरने यावर कधीही सार्वजनिकरित्या भाष्य केले नाही, आता त्याचाच भाऊ फैसलने दोघांच्या नात्यासंबंधाबद्दल भाष्य केले आहे.
काय आहे फैसल खानचा दावा?
आमिर आणि जेसिका हाईन्स यांच्या नातेसंबंधांच्या बातम्यानंतर आणि चर्चांनंतर आता सुमारे 20 वर्षांनंतर, फैसल खानच्या आरोपामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमिर खानचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातून एक मूल जन्माला आले असे जाहीररित्या फैसल खानने सांगितले आहे, त्याचा रोख जेसिका हाईन्स यांच्याकडे होता. सोशल मिडियावरही या दोघांसंदर्भात उलट सुलट चर्चा आहेत.
नातेसंबंधांच्या चर्चांनंतर जेसिका कुठे होत्या?
2005 मध्ये जेसिकाने एका मुलाखतीत आमिरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल भाष्य केले होते. आमिर खानसोबत नाते असल्याच्या चर्चानंतर 2007 मध्ये जेसिका हाईन्स यांनी लंडनमध्ये एका व्यावसायिकाशी लग्न केले आणि त्यानंतर त्यांनी भारतीय कलाकारांपासून दूर राहणे पसंत केले.
फैसल खान आणि आमिर खान यांच्यातील वाद काय आहे?
फैसल खानने सोमवारी 18 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन आमिर खान आणि कुटुंबियांसोबतचे सर्व संबंध तोडल्याची घोषणा केली. फैसलने आमिरवर त्याला घरात कोंडून ठेवल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचाही आरोप केला आहे.
फैसल आणि आमिरचे 'या' चित्रपटात सोबत काम
आमिर खान आणि फैसल हे भाऊ असून दोघांनी ब्लाॅकबस्टर ठरलेला'मेला' या चित्रपटात सोबत काम केले आहे. हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे आमिर खानचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.












Click it and Unblock the Notifications