Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Who is Elli Avram : एली एवराम कोण आहे? एकेकाळी हार्दिक पांड्यासोबत नाते? आता आशिष चंचलानीची प्रेयसी

Who is Elli Avram Movie Biography career in Marathi : बालीवूड अभिनेत्री आणि मॉडेल एली एवराम सध्या खूपच चर्चेत आहे आणि तिचे आणि youtuber आशिष चंचलानी यांचे काही खास अंदाजतील रोमांटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यामुळे आता हे दोघे एका नात्यात गुंफले असून ते रिलेशनशीपमध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे.त्यांनी प्रेमाची कबुली दिली असेही म्हटले जात आहे.

युट्युबर आशिष चंचलनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, त्यामध्ये तो मॉडेल एली एवराम हिला उचलून घेतो, आशिष आणि एली दोघेही खूप हसताना आणि आनंदी असल्याचे या फोटोत दिसत आहे. या फोटोवर एक कॅप्शनही लिहिलेलं आहे, जे रसिकांचे लक्ष वेधत असून जो संदेश द्यायचा तो त्यांनी दिला आहे. त्यामुळे दोघांचे नाते पुढे गेले असेही स्पष्ट जाणवते.

Who is Elli Avram

एली-आशिषच्या फोटोवर कॅप्शन काय?

एली एवराम हिने फोटोवर कॅप्शन लिहिले की,'फायनली' साथ आणि त्याच्या बाजूला एक लाल रंगाचा इमोजी सुद्धा तिने पोस्ट केलेला आहे, त्यामुळे कुठे न कुठे अशी शक्यता आहे की आशिष चंचलानी आणि एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे अधोरेखित होते.

हार्दिक पांड्यासोबत होती रिलेशनमध्ये...?

सांगायचे झाले तर भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत एली एवरामचे नाव जोडले गेले होते. त्या काळी दोघेही खूपच सोबत राहायचे. 2018 मध्ये अशा चर्चा होत्या की, एली एवराम आणि हार्दिक पांड्या रिलेशनशिपमध्ये होते, दोघे एकमेकांसोबत बऱ्याचदा दिसले होते, परंतु हे नातं टिकलं नाही आणि त्यांचा ब्रेकप झाला अशी चर्चाही नंतर रंगली.

एवढी चर्चेत असलेली एली एवराम कोण आहे?

  • एली एवराम सध्या खूपच चर्चेत असून आशिष चंचलानीसोबतच्या फोटोमुळे ती आता तर खूपच चर्चेत आहे.
  • एली एवराम एक अभिनेत्री असून मॉडेलही आहे.
  • विशेष म्हणजे एली एवराम ही स्वीडन-ग्रीक मॉडेल असून ती एक सुंदर अभिनेत्री ही आहे.
  • बिग बॉस सारख्या रियलिटी शोमध्ये सुद्धा ती सहभागी झाली होती.
  • बिग बॉस 7 मध्ये एली एवरामने सहभाग घेतला होता.
  • 'झलक दिखला जा' मध्येही तिने सहभाग घेतला होता.

2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण

एली एवराम हिने 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, मिकी वायरस या चित्रपटातून ती सिनेमागृहात झळकली. या चित्रपट मनीष पॉल याने लीड रोल केला होता. यासह एली अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केला आहे. यामध्ये किस किस को प्यार करू, वन नाईट स्टॅन्ड, गुड बाय, नाम शबाना, पोस्टर बॉईज अशा एका पेक्षा एक चित्रपटात ती होती. ती एक डान्सरही आहे आणि तिला गाण्याचा गाण्याची आवड पण आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+