कोण आहे धनश्री वर्मा ? जिच्यापासून युजवेंद्र चहल घेतोय घटस्फोट, डान्सिंग-सोशल मीडियातून कमावते इतके
Dhanashree Verma Net Worth: भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. त्यामुळे कोण आहे धनश्री वर्मा हे जाणून घेण्यासाठी लोकांना उत्सुकता आहे.
कोण आहे धनश्री वर्मा ?
धनश्री वर्मा एक उत्कृष्ट डान्सर आणि कोरिओग्राफर असण्यासोबतच एक प्रसिद्ध डेंटिस्ट देखील आहे. धनश्री टीव्हीवरील लोकप्रिय डान्स रिॲलिटी शो 'झलक दिखला जा 11' मध्येही दिसली होती. धनश्री वर्मा या डान्स रिॲलिटी शोच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. तिने आपल्या नृत्य कौशल्याने लोकांना वेड लावलं आहे.

धनश्री वर्मा यूट्यूबवर प्रसिद्ध
मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा यूट्यूबवर खूप प्रसिद्ध आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलवर 2.5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. धनश्रीने डान्स कोरिओग्राफीच्या माध्यमातून तिला लोकप्रियता मिळवली आहे.
धनश्री वर्मा करोडोंच्या मालमत्तेची मालकीन
धनश्री वर्मा तिच्या मेहनतीने आज करोडोंच्या संपत्तीची मालक बनली आहे. ती एक उत्कृष्ट डान्सर तर आहेच पण तिच्या सौंदर्याचेही लोक वेडे आहेत. धनश्री वर्माची एकूण संपत्ती 3 मिलियन डॉलर म्हणजेच 25 कोटी रुपये आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून करते भरपूर कमाई
धनश्री वर्माला लोक भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी म्हणूनही ओळखतात. धनश्री वर्मा तिच्या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, ब्रँड एंडोर्समेंट आणि कोरिओग्राफी द्वारे भरपूर कमाई करते. धनश्री लवकरच एका तेलगू चित्रपटातही दिसणार आहे.
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांच्यात घटस्फोट ?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहलच्या जवळच्या व्यक्तीने या जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी खरी असल्याचं म्हटले आहे. जवळच्या नातेवाईकांच्या मते, त्यांचा घटस्फोट निश्चित आहे, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांच्या जवळची व्यक्तीच्या म्हणण्यांनुसार घटस्फोट निश्चित आहे. तो अधिकृत होण्यासाठी फक्त वेळ आहे. त्यांच्या विभक्त होण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु हे स्पष्ट आहे की, या जोडप्याने वेगळे जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे.












Click it and Unblock the Notifications