Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Anurag Kashyap: ब्राह्मणांबद्दल अपशब्द वापरणारे अनुराग कश्यप कोण आहे?, किती श्रीमंत?

Anurag Kashyap Net Worth : महाराष्ट्रासह देशभरात सद्या महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटावरून वाद पाहायला मिळत आहे. ब्राह्मण समाजाच्या वतीने या चित्रपटाला विरोध केला जात असल्याचे चित्र आहे. अशातच चित्रपट निर्माते आणि अभिनेता अनुराग कश्यप यांनी 'फुले' या चित्रपटाची बाजू घेऊन ब्राह्मण समाजाविरोधात अपशब्द वापरले आहे. त्यामुळे कश्यप यांच्यावर देखील आरोप होऊ लागले आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा अनुराग कश्यप चर्चेत आले आहेत. चला तर जाणून घेऊया अनुराग कश्यप नेमकं कोण आहेत, त्यांची संपत्ती किती तसेच अनुराग कश्यप यांचे चित्रपट कोणते आहेत..!

चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याने अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट केली. ज्यामध्ये त्याने 'फुले' चित्रपटावरून सुरू असलेल्या जातीयवादाच्या गोंधळाविरुद्ध भाष्य केले. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना त्यांनी आजही देशात जातिवादाच्या अस्तित्वाबद्दल एक मोठा आणि स्पष्ट प्रश्न उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रीय ब्राह्मण गटांकडून होणाऱ्या संतापाबद्दल आणि अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनाला होणाऱ्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली.

Anurag Kashyap

काय म्हणाले अनुराग कश्यप?

इंस्टाग्राम स्टोरीजवर अनुराग कश्यप यांनी लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील पहिले नाटक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर होते. भाऊ, जर या देशात जातीयवाद नसता तर त्यांना लढण्याची काय गरज होती?, आता या ब्राह्मण लोकांना लाज वाटत आहे किंवा ते लाजेने मरत आहेत किंवा ते आपण पाहत असलेल्या वेगळ्या (पर्यायी) ब्राह्मण भारतात राहत आहेत, जे आपण समजू शकत नाही. कोणीतरी कृपया समजावून सांगा - इथे खरं मूर्ख पणा कोण करत आहे?'

इन्स्टाग्राम पोस्टवर पुढे अनुराग कश्यप यांनी विधान केले की, इतकेच नाही तर अनुरागने सीबीएफसी गटांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीवर आणि त्यांना पाठवलेल्या चित्रपटाच्या तपशीलांवरही प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, 'माझा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा चित्रपट सेन्सॉरशिपसाठी जातो. तेव्हा बोर्डात चार सदस्य असतात. परवानगी न मिळता विशिष्ट गट चित्रपटांमध्ये प्रवेश कसा मिळवतात? संपूर्ण व्यवस्थाच गोंधळलेली आहे.

समाजातील तथाकथित 'अस्वस्थ सत्य' दाखवणारे 'पंजाब 95', 'टीस', 'धडक 2' सारखे अनेक चित्रपट सेन्सॉरशिपला सामोरे जातात आणि प्रदर्शित होत नाहीत याबद्दल अनुराग कश्यप यांनीही दुःख व्यक्त केले. तो म्हणाला की, आरशात आपला चेहरा पाहून त्याला लाज वाटते. त्यांना इतके लाज वाटते की, ते उघडपणे सांगू शकत नाहीत, या चित्रपटात असे काय आहे जे त्यांना त्रास देते, भित्रे कुत्रे कुठले!

'मग तुम्ही ब्राह्मण कसे असू शकता?'

अनुराग कश्यप यांनी ब्राह्मणांना भारतात जातिवाद आहे की नाही हे ठरवण्यास सांगितले. त्यांनी प्रश्न केला की, 'धडक-2' च्या प्रदर्शनादरम्यान सेन्सॉर बोर्डाने आम्हाला सांगितले की मोदीजींनी भारतातील जातिव्यवस्था नष्ट केली आहे. त्याच कारणास्तव, संतोष देखील भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. आता, ब्राह्मण फुलेंवर आक्षेप घेत आहेत. भाऊ, जर जातीव्यवस्था नसेल तर तुम्ही ब्राह्मण कसे असू शकता?, तुम्ही कोण आहात? तुम्ही का अस्वस्थ होत आहात?

कोण आहेत अनुराग कश्यप?

अनुराग सिंग कश्यप यांचा जन्म् 10 सप्टेंबर 1972 रोजी झाला. हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक आहेत. कश्यप यांचा प्रथम चित्रपट 'पांच' हा होता. दिग्दर्शक म्हणून त्यांचे ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकींग, देव डी, गुलाल, दॅट गर्ल ईन यलो बुट्स आणि गॅंग्स ऑफ वासेपूर हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. फिल्मफेअर पुरस्कारविजेता चित्रपट सत्या आणि ऑस्करसाठी नामांकित झालेला वॉटर या चित्रपटांसाठी त्यानी पटकथालेखन केले होते.

अनुराग कश्यप किती कोटींचे मालक आहेत?

अनुराग कश्यपचा चित्रपट प्रवास 2007 मध्ये 'ब्लॅक फ्रायडे' चित्रपटाने सुरू झाला. तो सर्वात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. गँग्स ऑफ वासेपूरच्या यशाने त्याची एकूण संपत्ती लक्षणीयरीत्या वाढली. चित्रपट निर्माते सहसा संख्येमागे धावत नाहीत तर एक चांगला चित्रपट बनवण्यावर विश्वास ठेवतात. काही अहवालानुसार, अनुराग कश्यपची एकूण संपत्ती 850 कोटी रुपये आहे.

अनुराग कश्यप दरमहा किती कमावतो?

काही मीडियाच्या अहवालानुसार, अनुराग कश्यप दरमहा 6 कोटी रुपये कमावतो, ज्यामध्ये त्याचे स्वतःचे गुंतवणूक आणि चित्रपटांमधून मिळणारे उत्पन्न दोन्ही समाविष्ट आहे. अनुराग केवळ दिग्दर्शकच नाही तर 'अनुराग कश्यप फिल्म्स' या निर्मिती संस्थेचा मालक देखील आहे.

त्यांच्या कंपनीने पाठिंबा दिलेला पहिला चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झालेला 'उडान' होता, जो बॉक्स ऑफिसवर मोठा यशस्वी ठरला. 2018 मध्ये, त्यांनी विकास बहल, विक्रमादित्य मोटवणे आणि मधु मंटेना यांच्यासोबत फँटम फिल्म्स नावाचा संयुक्त उपक्रम सुरू केला होता. बेधडक व विविध विषयांवर खुले पणाने मत मांडणारा दिग्ददर्शक म्हणून त्यांची ओळख आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+