Janhvi Kapoor ला 'या' खास व्यक्तीने गिफ्ट केली 4 कोटींची कार, अभिनेत्रीला कोण लावतंय एवढा जीव
Janhvi Kapoor latest News in Marathi : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला एक खास गिफ्ट मिळाले आहे. तीला हे खास गिफ्ट तिच्या आई वडीलांनी किंवा बॉयफ्रेडंने देखील दिले नाही. हे खास गिफ्ट तीला तिच्या मैत्रीणीने दिले आहे. अतिशय महागडे गिफ्ट भेटल्यानंतर सर्वत्रच चर्चा सुरू झाली आहे.
जान्हवी कपूरच्या अद्भुत कार कलेक्शनमध्ये आता आणखी एक लक्झरी कारची भर पडली आहे. ही कार अनन्या बिर्ला यांनी जान्हवीला भेट दिली आहे. अनन्या बिर्ला ही देशातील सर्वात श्रीमंत मुलींपैकी एक तर ती जान्हवीची चांगली मैत्रीण देखील आहे.

लॅम्बोर्गिनी कारचे वैशिष्ट्ये
लॅम्बोर्गिनी कार तिच्या स्पोर्ट्स लूकसाठी खास प्रसिद्ध आहे. ही कार पाहिल्यानंतर लोकांना 2004 मध्ये प्रदर्शित झालेला अजय देवगणचा 'टारझन द वंडर कार' हा चित्रपट आठवतो. त्या कारचा रंगही जांभळा होता. अतिशय स्पोर्ट्स लुक कार आज जान्हवील कपूरला तिच्या मैत्रीणीने गिफ्ट केली आहे.
लॅम्बोर्गिनीची शक्ती
अनन्या बिर्ला यांनी जान्हवीला भेट दिलेली कार 5.2-लिटर V10 इंजिनने सुसज्ज आहे. जी 640 CV (470 kW) पॉवर आणि 8,000 rpm चा पीक स्पीड निर्माण करते. ही कार फक्त 3.1 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठते. या कारचा टॉप स्पीड 325 किलोमीटर प्रति तास आहे.
जान्हवी कपूरचे कार कलेक्शन
या लॅम्बोर्गिनी व्यतिरिक्त जान्हवी कपूरकडे इतर अनेक गाड्यांचा संग्रह आहे. तिच्याकडे 2.5 कोटी रुपयांची टोयोटा लेक्सस, 1.62 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ ए-क्लास, 67.15 लाख रुपयांची मर्सिडीज जीएलई 250 डी आणि 95.9 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू एक्स 5 आहे.
कोण आहे अनन्या बिर्ला?
जान्हवी कपूरची मैत्रीण आणि उद्योगपती अनन्या बिर्ला ही बडे उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. व्यवसायाव्यतिरिक्त, अनन्या एक गायिका देखील आहे, जिचे अनेक गाणी रिलीज झाली आहेत. लोकांना त्यांची गाणी खूप आवडतात.












Click it and Unblock the Notifications