Paresh Rawal : परेश रावल यांना स्वःतचे मुत्र पिण्याचा सल्ला कुणी दिला? पाय बरा झाल्याचा केला दावा
Who advised Paresh Rawal to drink his own urine : अभिनेता परेश रावल यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांचा हा दावा आता चर्चेत असून परेश रावल यांनी स्वःतचे मुत्र पंधरा दिवस पिले त्यानंतर त्यांचा मोडलेला पाय बरा झाला होता असा त्यांचा धक्कादायक दावा आहे.
परेश रावल यांनी जरी हा दावा केला असला आणि त्यांनी त्यांचे मुत्र पिऊन पाय बरा केला असला तरीही मुळातः प्रश्न हा आहे की, त्यांना मोडलेला पाय बरा करण्यासाठी स्वःतचे मुत्र पिण्याचा सल्ला कुणी दिला? आज आपण परेश रावल यांचा दावा त्यांनी मुलाखतीत केलेले भाष्य आणि त्यांना हा सल्ला कुणी दिला याची माहिती घेऊया.

काय आहे परेश रावल यांचे वक्तव्य?
बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांच्या मुलाखतीने आता एक मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याचे मुख्य कारण म्हणजे स्वतःचे मूत्र प्यायल्याने सांधेदुखी बरी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांना एका दिग्गज दिग्दर्शकाने स्वःतचे मूत्र पिण्याचा सल्ला दिला होता.
का मोडला होता परेश रावल यांचा पाय?
परेश रावल ज्यावेळी फिल्म घातक या चित्रपटाची शुटींग करत होते, त्यावेळी त्यांना राकेश पांडे यांना ओढत आणायचे होते असा तो सीन होता, त्यावेळी परेश रावल पडले आणि त्यांच्या गुढघ्याला इजा झाली हेती, त्यांना वाटले की, त्यांचे करीअर संपले नंतर ते रुग्णालयात दाखल झाले.
कुणी दिला होता परेश रावल यांना मुत्र पिण्याचा सल्ला?
याबाबत परेश रावल म्हणाले की, मी रुग्णालयात असताना वीरू देवगण मला भेटायला आले होते. त्यांनी मला विचारले. माझ्या पायाला दुखापत झाली आहे. मी म्हणालो मला सांधेदुखी आहे. ते म्हणाले की, रोज सकाळी स्वतःचे मूत्र प्यायले तर ती बरी होईल, म्हणून मी दररोज सकाळी माझे मूत्र बिअरप्रमाणे प्यायचे ठरवले. "मूत्र प्यायल्यानंतर 15 दिवसांत माझी जखम पूर्णपणे बरी झाली."
अभिनेते परेश रावल यांनी सांगितले की, अभिनेता अजय देवगण याचे वडील आणि दिग्गज दिग्दरशक वीरू देवगण यांच्या सल्ल्यानुसार रोज सकाळी स्वतःची लघवी प्यायल्यानंतर त्यांच्या पायाची दुखापत 15 दिवसांत पूर्णपणे बरी झाली. पंधरा दिवस स्वःतचे मुत्र पिण्याचा सल्ला त्यांना विरु देवगण यांनी दिल्याचे रावल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
परेश रावल यांच्या वक्तव्याने वादंग!
अभिनेते परेश रावल यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक जण परेश रावल यांच्यावर टीका करत आहेत. अशा परिस्थितीत कोणीही स्वःतचे मूत्र पिऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अभिनेते परेश रावल यांच्यावर वैद्यकीय क्षेत्रातीनही टीका होत आहेत. मूत्र पिल्याने सांधेदुखी बरी होते याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. शिवाय, ते शरीरासाठी चांगले असल्याचाही कोणताही पुरावा नाही. याउलट लघवी पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे असे डाॅक्टर सांगतात.
मूत्रामध्ये बॅक्टेरिया आणि टॉक्सिन असतात जे शरीरासाठी चांगले नाहीत. किडनीला लघवीच्या रूपात शरीरातील कचरा बाहेर टाकण्यास त्रास होतो. अशा वातावरणात पुन्हा लघवी प्यायल्याने आपल्या शरीराची मोठी हानी होऊ शकते असेही तज्ज्ञ म्हणतात.












Click it and Unblock the Notifications