Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'गोविंदा सर कुठे आहेत?', पत्नी सुनीता आहुजाने दिली अशी प्रतिक्रिया की आता व्हिडीओ होतोय व्हायरल

Sunita Ahuja On Govinda: मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा हे लोकांमध्ये चर्चेचा विषय आहेत. हे जोडपे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या ही समोर आल्या होत्या. मात्र त्यानंतर दोघांनीही ही अफवा असल्याचे सांगितले होते.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आणि तिचा मुलगा यशवर्धन आहुजासोबत 27 मार्च 2025 रोजी एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. यादरम्यान आई-मुलाची जोडी अतिशय स्टायलिश पद्धतीने कार्यक्रमात एंट्री करताना दिसली. तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुनीता आहुजा यांना पती गोविंदाबद्दल विचारले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती.

govinda wife sunita ahuja

सुनीता आहुजाने दिली अशी प्रतिक्रिया

सुनीता आहुजा पती गोविंदासोबत येण्याऐवजी त्यांचा मुलगा यशवर्धन आहुजासोबत कार्यक्रमाला पोहोचल्या. सुनीताने रेड कार्पेटवर भव्य एंट्री केली. गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा काळ्या रंगाचा शर्ट, तपकिरी रंगाचा शेड्स, क्रीम रंगाचा ब्लेझर आणि मॅचिंग पँटमध्ये खूपच स्मार्ट दिसत होता. तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी सुनीता आहुजा आणि त्यांचा मुलगा यशवर्धन यांचे बरेच फोटो काढले.

या आणि आश्चर्याने म्हणाली, काय? त्यानंतर ती मोठ्याने हसली. यानंतर, पापाराझीने सुनीताला पुन्हा विचारले की, गोविंदा सर उशीराने एंट्री करणार आहेत का ? त्यानंतर एक छायाचित्रकार म्हणाला की ,जोडी नंबर 1 गोविदा सरांना आम्ही मीस करत आहोत, सुनीताही हसली आणि विलंब न करता म्हणाली - आम्हीही ते करत आहोत.

दरम्यान गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाची प्रतिक्रिया पाहून केवळ माध्यम प्रतिनिधीच नाही तर सामान्य लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 27 मार्च 2025 रोजी सुनीता आहुजा त्यांचा मुलगा यशवर्धनसोबत मुंबईत झालेल्या एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

गोविंदाचे चाहते सुनीतावर संतापले

दुसरीकडे सुनीता आहुजाची ही प्रतिक्रिया पाहून गोविंदाचे चाहते खूप संतापले आहेत. सुनीताच्या या व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले, "माफ करा, पण तुम्ही गोविंदाच्या नावाने तुम्ही ओळखले जाता." तर दुसऱ्या एका युजरने लिहिले- तिने हे लक्षात ठेवले पाहिजे की, ती आणि तिची मुले जे काही आहेत किंवा ज्यासाठी ओळखली जातात ते गोविंदा आणि त्याच्या स्टारडममुळे आहेत.

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा

काही काळापूर्वी गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर सुनीता यांनी या अफवा फेटाळून लावल्या होत्या . सुनीता आहुजा म्हणाल्या होत्या की, त्यांची मुलगी आणि कुटुंबामुळे गोविंदा घरापासून वेगळा राहतो. सुनीता म्हणाली होती की, गोविंदाला राजकारणासाठीही वेळ द्यावा लागला आणि त्यासाठी कुटुंबापासून दूर राहणे आवश्यक होते. या जगात असा कोणीही नाही, जो मला आणि गोविंदाला वेगळे करू शकेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+