War 2 Teaser Out : हृतिक रोशन, कियारा अडवाणीचा 'वाॅर 2' चा टिझर रिलिज, या दिवशी सिनेमागृहात झळकणार
War 2 Teaser Out : बाॅलीवूडचा चाॅकलेट बाॅय हृतिक रोशनच्या 'वॉर 2' या अॅक्शनपट आणि थ्रीलर चित्रपटाचा टीझर रिलीज आज रिलीज झाला आहे. या चित्रपटामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. वाॅर कधी प्रदर्शीत होतो याचीच प्रेक्षक आता वाट पाहत आहे.
'वॉर 2' चित्रपटाचा धमाकेदार टीझर 20 मे 2025, मंगळवार रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटात हृतिक रोशन मुख्य नायकाच्या भूमिकेत असून प्रसिद्ध दक्षिण अभिनेता ज्युनियर एनटीआरने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवशी टीझर रिलीज झाला.

'वॉर 2' चित्रपटाद्वारे साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशा परिस्थितीत, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'वॉर २' च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांना चित्रपटाच्या टीझरच्या रूपात एक मोठी भेट मिळाली.
'वॉर 2' चित्रपट अॅक्शन-थ्रिलरपट
भरपूर अॅक्शन-थ्रिलरने 'वॉर 2' हा चित्रट भरलेला आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर आता ट्रेंड होऊ लागला आहे आणि लोक आता विचारत आहे की, हा चित्रपट कधी येणार आहे. चित्रपटाचा टीझरची आता चर्चा सुरु झाल्याचे दिसत आहे.
किती मिनिटांचा आहे टिझर?
वाॅर 2 हा अॅक्शनपटाचा टिझर जवळपास 1 मिनिट 34 सेकंदाचा आहे. या टीझरमध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील काही सिन्स दाखवण्यात आले आहे. त्यावरुन हा चित्रपट अॅक्शनपट असल्याचा अंदाज लागतो.
अभिनेत्रीच्या रुपात कियारा अडवाणी
वाॅर 2 मध्ये अभिनेत्रीच्या रुपात कियारा अडवाणीची आपली खास अदाकारी दिसेल. आज प्रदर्शित टीझरमध्ये कियारा अडवाणीची झलकही दिसली आहे. आता तिची भुमिका या चित्रपटात किती आणि कशी खास आहे हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
वाॅर 2 बद्दल खास मुद्दे
- वाॅर 2 हा या वर्षातील सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
- निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात प्रमोशन सुरू केले आहे.
- खास बाब म्हणजे वाॅर 2 चित्रपटाचे चित्रीकरण अजूनही सुरू आहे.
- वाॅर 2 चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
ऋतिक रोषनन साकारली राॅ एजंटची भूमिका
'वॉर २' चित्रपटात हृतिक रोशन रॉ एजंट मेजर कबीर धालीवालची भूमिका साकारली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर हा खलनायकाची भूमिकेत तर कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्री आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 संपूर्ण भारतात विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे.












Click it and Unblock the Notifications