गुगल सर्चमध्ये विराट-अनुष्काचा मुलगा दुसऱ्या स्थानी, नेमका काय आहे 'अकाय'चा अर्थ
Lookback 2024 Trends- यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना मुलगा झाला. अनुष्काने चार-पाच दिवासंनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर ही आपल्या बळाची बातमी थेट नावाने जगजाहीर केली. त्यांच्या बाळाचं नाव अकाय ठेवल्याचं तिने सांगितलं. झालं. तेव्हापासून गेल्या वर्षभरात विराट कोहली व अनुष्का शर्माच्या मुलाच्या नावाने गुगल सर्चमध्ये थेट दुसरे स्थान मिळवले. विराटच्या मुलाच्या नावाचा अर्थ शोधण्याचा नेटकऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केला. सर्चमध्ये विराटचा मुलगा थेट दुसऱ्या स्थानी पोहोचला.

फेब्रुवारीमध्ये झाला जन्म
अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. या वर्षाच्या सुरूवातीलाच फेब्रुवारीमध्ये अनुष्का आणि क्रिकेटपटू विराट कोहली दुसऱ्यांदा पालक झाले. अनुष्काने लंडनमध्ये 15 फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला. अनुष्काने चार-पाच दिवसांनी तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर मुलाचं नाव अकाय ठेवल्याचं सांगितलं. 'आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे. बाळाचं नाव अकाय ठेवलं असून वामिका हिला एक छोटा भाऊ मिळाला आहे. तुमचा आशीर्वाद सदैव राहू दे. आमच्या प्रायव्हसीचा मान राखावा,' अशी विनंतीही त्यांनी या पोस्टमधून केली होती.
अकाय म्हणजे नेमकं काय?
विराट कोहली आणि अनुष्काने आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं. मात्र हे नाव जरा वेगळं असल्याने अनेकजण बुचकळ्यात पडले. या वेगळ्या नावाचा अर्थ काय, असा प्रश्न अनेकांना पडला. अकायचा अर्थ सांगायचा तर चमकणारा चंद्र असा होतो. या आगळ्यावेगळ्या नावाची आजही चर्चा होत असते. त्यांच्या मुलीचं नावही असंच वेगळं आहे. वामिका असं तिचं नाव असून, वामिका म्हणजे दुर्गा देवी. दोन्ही मुलांची अर्थपूर्ण नाव ठेवलेल्या विराट-अनुष्काने आपल्या दोन्ही मुलांना सोशल मीडिया व मीडियापासून दूर ठेवले आहे. या दोघांचा चेहरा आत्तापर्यंत एकदाही मीडियासमोर आलेला नाही.
सर्चिंगमध्ये दुसऱ्या स्थानी
मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनुष्काने मुलाच्या जन्माची घोषणा केली होती. तेव्हापासून विराट- अनुष्काचा मुलगा सोशल मीडियावर गाजू लागला आहे. तो कसा दिसतो, अकायचा अर्थ काय याबाबत नेटकऱ्यांचा शोध सुरु झाला. अकायचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. अनुष्का - विराटचा मुलगा अकायच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका शोधला गेला की त्याने 2024 या वर्षासाठी गुगलच्या सर्चमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. अकायचा अर्थ काय हा सर्च गुगलवर दुसऱ्या स्थानी आहे.












Click it and Unblock the Notifications