अभिनेता विक्रांत मॅसीची निवृत्तीची घोषणा, एका चित्रपटासाठी घेतो करोडो रुपये, जाणून घ्या संपत्ती
Vikrant Massey Net Worth: टीव्ही मालिका बालिका वधू ते बारावी फेल या चित्रपटापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारा विक्रांत मॅसी आपल्या चाहत्यांना आज एक धक्का दिला आहे. अभिनेता विक्रांत मॅसी 'द साबरमती रिपोर्ट'नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या दरम्यान विक्रांत मॅसीने निवृत्तीची घोषणा केली आहे.
विक्रांत मॅसीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार व्यक्त करताना म्हटलं आहे की," गेली काही वर्षे आणि त्यापूर्वीची वर्षे खूप चांगली होती. तुमच्या पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो".

पुढे विक्रांत मॅसी म्हणतो की, 'आता आयुष्यात पुढे जाताना मला जाणवले की, एक वडील, एक पती, एक मुलगा आणि एक अभिनेता म्हणून माझी घरी परतण्याची वेळ आली आहे. 2025 मध्ये तुम्ही मला शेवटचं पडद्यावर पाहणार आहात. शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या सुंदर आठवणी. मधल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद," असं त्यांना आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
विक्रांत मॅसीच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झालं तर, छोट्या पडद्यावर उत्कृष्ट अभिनय केल्यानंतर त्याने ओटीटीमध्ये प्रवेश केला. मिर्झापूर आणि क्रिमिनल जस्टिस सारख्या वेब सीरिजमध्ये काम करून त्याला चांगलीच प्रसिध्दी मिळाली. 12वी फेल हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्याच्या कारकिर्दीत बदल झाला. या चित्रपटाने प्रचंड कमाई करून चाहत्यांची मने जिंकली. पण विक्रांत मॅसीची एकूण संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
विक्रांत मॅसीची नेटवर्थ
मीडिया रिपोर्ट्सनुसार विक्रांत मॅसीची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी अभिनेता सुमारे 1.2 कोटी ते 2 कोटी रुपये घेतो. चित्रपटांव्यतिरिक्त, तो अनेक मोठ्या ब्रँडशी देखील संबंधित आहे आणि जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो. एका जाहिरातीसाठी अभिनेता सुमारे 50 लाख रुपये मानधन घेतो.
विक्रांत मॅसीची मालमत्ता
विक्रांत मॅसीने लग्नाच्या वेळी मुंबईत आलिशान अपार्टमेंट घेतले होते. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. मात्र, या घराच्या किमतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आलिशान घराव्यतिरिक्त विक्रांत मॅसीला महागड्या गाड्यांचाही शौक आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Volvo S90-D4 आहे. ज्याची किंमत 60 लाख रुपये आहे. याशिवाय मारुती सुझुकी डिझायर देखील आहे.
12वी फेल या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर विक्रांत मॅसीचा द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये 2002 मध्ये घडलेली गोध्रा घटना दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने तितकी कमाई केली नसली तरी चाहते विक्रांतच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. आता या चित्रपटानंतर विक्रांत मॅसीने अभिनयाला अलविदा करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते निराश झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications