लग्न होऊन एक आठवडाही झाला नाही आणि सोनाक्षी प्रेग्नंट?, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा प्रियकर झहीर इक्बाल मागील काही दिवसापासून सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आहे. सोनाक्षी शत्रुघ्न सिन्हा यांची एकुलती एक मुलगी आहे.

तिने तिचा प्रियकर झहीर इक्बालशी 23 जून 2024 रोजी सिव्हील मॅरेज पद्धतीने यांनी लग्न केले. त्यानंतर एका मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. या पार्टीत झहीर इक्बाल सोबत सोनाक्षी धमाल करताना दिसली. यासोबतच लग्नाच्या पार्टीत सलमान,अनिल कपूर देखील या पार्टीसाठी उपस्थित होते.
सोनाक्षी तिच्या पतीसोबत कोकिलाबेन हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाली आहे.हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. जेव्हा सोनाक्षी तिच्या पतीसोबत हॉस्पिटलबाहेर दिसली तेव्हा प्रेग्रंट असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. सोनाक्षी सिन्हाला पाहताच लोक म्हणू लागले की, लग्न होऊन एक आठवडाही झाला नाही आणि अभिनेत्री आई होणार आहे. याचा अर्थ सोनाक्षी आधीच प्रेग्नंट असावी.
सोनाक्षी हॉस्पिटलच्या फेऱ्या का मारतेय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते.मात्र आता चाहत्यांची निराश झाली आहे. सोनाक्षीच्या प्रेग्नेंसीच्या बातमीत तथ्य नाही. या फक्त अफवा आहेत, सत्य हे आहे की, सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे. लग्नाच्या धामधुमीत शत्रुघ्न सिन्हा खूप थकले होते, त्यानंतर ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. सोनाक्षी तिच्या पतीसोबत वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात आली होती.












Click it and Unblock the Notifications