विकी कौशलचा 'छावा' घरी बसून पहायचाय? 'या' दिवशी OTT वर होणार प्रदर्शित; कुठे, कसा पहायचा? वाचा
वर्ष २०२५ मध्ये आत्तापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र विकी कौशलच्या 'छावा'च्या आसपासही कोणताच चित्रपट आला नाही. कोणताच चित्रपट 'छावा'शी स्पर्धा करू शकला नाही. सलमान खानच्या 'सिकंदर' कडून चांगल्या अपेक्षा होत्या. ईदला तो प्रदर्शित झाल्यानंतर तो 'छावा'शी स्पर्धा करेल, असे वाटत होते. मात्र तसेही झाले नाही. सिकंदर 'छावा'च्या आसपासही आला नाही. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता 'छावा' ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

'छावा' ओटीटीवर येणार
विकी कौशलचा 'छावा' चित्रपट आता थिएटरनंतर ओटीटीमध्ये धमाल करण्यास सज्ज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विकी कौशलचा सुपरहिट चित्रपट 'छवा' लवकरच ओटीटीवर येणार आहे. चित्रपटाचे थिएटर रन संपल्यानंतर लवकरच निर्माते ओटीटीवर चित्रपटाचा प्रीमियर करतील. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
कधी येणार ओटीटीवर?
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' या चित्रपटाबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. परंतु अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही ते तो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. चित्रपटातील संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला विकी कौशलने इतका न्याय दिला की तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसली होती. विनीत कुमार सिंग कवी कलशच्या भूमिकेत दिसला होता तर अक्षय खन्ना मुघल शासक औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला होता.
थिएटरमध्ये घातला धुमाकूळ
१४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ चाहत्यांची मने जिंकली नाहीत तर निर्मात्यांनाही आश्चर्यचकित केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र संभाजी महाराज यांच्या गाथेवर आधारित 'छावा' चित्रपटात विकीचा अभिनय पाहून लोक आश्चर्यचकित झाले. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की त्याने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल ५९४ कोटी रुपये कमावले आणि चित्रपटाने जगभरात ७९० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.
कुणी केल्या आहेत भूमिका?
छावामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदान्ना, आशुतोष राणा आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मराठा योद्धा संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकीच्या कामाचे खूप कौतुक झाले. याशिवाय त्यांनी मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना याने लाजवाब साकारली आहे. विशेष म्हणजे त्याने मोठ्या पडद्यावर या भूमिकेच्या सर्व आवश्यकता उत्तम प्रकारे पार पाडल्या. याशिवाय आशुतोष आणि रश्मिका यांचे कामही कौतुकास्पद वाटले.












Click it and Unblock the Notifications