'शब्दों से परे सम्मान!'विकी कौशलनेही मानले मोदींचे आभार; 'छावा'ची मोदींकडून तोंडभरुन स्तुती
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपटाने भारतात २२५ कोटींहून अधिक कमाई केली. कमाईचा हाच आकडा जगभराचा विचार केला तर ३०० कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता या चित्रपटाचे कौतुक केले आहे. पीएम मोदी यांनी कौतूक केल्यानंतर आता अभिनेता विकी कौशलनेही पंतप्रधानांचे आभार मानले आहे. हा सन्मान शब्दांपलीकडचा आहे, असे त्याने म्हटले आहे.

काय म्हणाले होते मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटाबद्दल देशभरात सुरू असलेल्या चर्चेवर पंतप्रधान म्हणाले, "आजकाल 'छावा' हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन उंची दिली आहे. 'छावा' हा चित्रपट प्रसिद्ध होत आहे. शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीत वर्णन केलेले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य चित्रपटाच्या स्वरूपात सादर केले आहे."
अभिनेता व मॅडाँकनेही मानले आभार
पीएम मोदी यांच्या कौतुकानंतर अभिनेता विकी कौशलने "शब्दों से परे सम्मान! पीएम नरेंद्र मोदी आपका आभार." म्हणत एक पोस्ट शेअर केली. मॅडॉक फिल्म्सनेही पंतप्रधान मोदींचे आभार मानले. इंस्टाग्रामवरील पोस्टसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "एक ऐतिहासिक सन्मान! पंतप्रधान मोदी 'छावा'चे कौतुक करतात आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आणि वारशाचा सन्मान करतात हा अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण आपल्याला कृतज्ञतेने भरून टाकतो. मॅडॉक फिल्म्स, दिनेश विजन, लक्ष्मण उतेकर, विकी कौशल आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या विशेष उल्लेखाने भारावून गेली आहे."
छावाची विक्रमी कमाई
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदान्ना यांनी महाराणी येसूबाईची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. १४ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. ८ दिवसांत या चित्रपटाने जगभरात २४२.२५ कोटी आणि जगभरात ३०७.५ कोटी रुपये कमावले आहेत.












Click it and Unblock the Notifications