Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'छावा'तील तो आगीचा सीन कसा शूट झाला? मराठमोळ्या साक्षीच्या धाडसाची का होतेय चर्चा? कोण आहे साक्षी?

अभिनेता विकी कौशिकच्या छावा चित्रपटाने कमाईचे अनेक रेकाॅर्ड आपल्या नावे केले आहेत. बाॅलिवूडमध्ये हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा, तर सर्व भारतीय भाषांतील तिसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जसा अभिनेता विकी कौशिक भाव खावून गेला, तसेच इतर अनेक कलाकारांनीही छाप सोडली. विकी कौशिक सध्या त्याच्या सोशल मीडियावर बिहाईंड द सिन्सचे काही किस्से शेअर करत आहे. त्यापैकी त्याने शेअर केलेल्या एका मराठमोळ्या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे.

Vicky Kaushik s behind the scenes

स्वतः जाळून घेणारी मुलगी

बिहाईंड द सिन्समध्ये विकीने मराठमोळ्या साक्षी सकपाळचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. औरंगजेब जेव्हा स्वराज्यावर चाल करुन येतो. तेव्हा या मेंढपाळ मुलीला तो जिवंत जाळतो. हा सीन चित्रपटात चांगलाच गाजला होता. याच साक्षीचा चित्रिकरणादरम्यानचा व्हिडीओ विकी कौशिकने शेअर केला आहे. साक्षीने स्वतःचा जीव धोक्यात घालून चित्रित केलेला हा सीन सध्या इंटरनेटवर चांगलीच धमाल उडवत आहे.

साक्षीने जिंकली मने

साक्षीला जाळण्याच्या हा सीन शूट करताना व्हिएफएक्सची मदत घेण्यात आली नव्हती. साक्षीने स्वतः हा धोकादायक सीन शूट केला. आगीचा जाळ अंगाखांद्यावर घेत साक्षीने हा सीन केलाय. हृदयाचा ठोका चुकविणारा हा सीन नेमका कसा शूट झालाय, हेच विकीने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलेय. मात्र मराठमोळ्या साक्षीच्या याच धाडसाची चर्चा सध्या सर्वंत्र सुरु आहे.

स्वत: शेअर केला व्हिडीओ

साक्षीने ३ मार्चला स्वतः या शुटींगचा काही भाग शेअर केला होता. त्यात तिने म्हटलं होतं की, "पहिल्यांदा मी अभिनेत्री आणि स्टंट गर्ल म्हणून 'छावा' चित्रपटामध्ये काम केलं. संपूर्ण दिवस माझ्या या सीनसाठी सेटअप करण्यात आला होता. माझा अभिनय आणि आगीच्या या दृष्यासाठी एक संपूर्ण दिवस ठेवण्यात आला होता. मला हे शूट करताना छान आणि तितकाच विचित्र अनुभवही आला. मला या चित्रपटात काम करता आलं याचा फार आनंद आहे."

750 कोटींची कमाई

'छावा' चित्रपटामधील हा आगीत होरपळतानाचा सीन शूट करण्यासाठी काय विशेष तयारी करण्यात आली यासंदर्भातील कॅमेरामागील घडामोडींचा व्हिडीओ साक्षीने 10 मार्च रोजी शेअर केला आहे. यामध्ये सीनपूर्वी साक्षीने परिधान केलेला विशेष ड्रेस, त्यानंतर तिचा इजा होऊ नये म्हणून घेण्यात आलेली काळजी आणि इतर गोष्टींचा समावेश असल्याचं दिसत आहे. 'छावा' चित्रपटाने जगभरामध्ये 31 दिवसांमध्ये जगभरामध्ये 750 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. भारताबाहेर या चित्रपटाने 89 कोटी 20 लाख रुपये कमवले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+