'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीचे खरंच बद्रीनाथजवळ मंदीर आहे का? किती आहे श्रीमंत? का असते चर्चेत? वाचा
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या चित्रपट कारकिर्दीपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. काही काळापूर्वी ती भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतवर टिप्पणी केल्यामुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. त्यानंतर तिचा खाजगी व्हिडिओ लीक झाल्यामुळे ती चर्चेत आली. आता ती तिच्या एका वेगळ्याच दाव्यामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिने असा दावा केला आहे की, तिच्या नावाने उत्तराखंडमध्ये एक मंदीर आहे. तिथे लोक तिची पूजा करतात. तिच्या या दाव्याानंतर एकच खळबळ उडाली. अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

काय म्हणाली होती उर्वशी?
अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने नुकतीच सिद्धार्थ कन्ननच्या पाॅडकास्टला भेट दिली होती. त्यावेळी बोलताना तिने दावा केला होता की, उत्तराखंडमध्ये तिच्या नावाने एक मंदीर आहे. ती म्हणाली होती की, दक्षिणेतही असेच काहीतरी घडावे अशी इच्छा आहे. कारण ती तेथेच काम करते. ती म्हणाली होती की, तुम्ही जर बद्रीनाथमध्ये गेला तर त्याच्या बाजुलाच माझ्या नावाचे मंदीर आहे. उर्वशीच्या या वक्तव्यानंतर चांगलाच वाद पेटला.
किती आहे संपत्ती?
मूळची उत्तराखंडची असलेली उर्वशी रौतेला हिने कठोर परिश्रम करून भरपूर पैसे कमवले आहेत. उर्वशी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम मॉडेल देखील आहे. उर्वशी रौतेलाची एकूण संपत्ती ३० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच २३८ कोटी रुपये आहे. उर्वशी एका महिन्यात ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करते. वयाच्या १५ व्या वर्षी सौंदर्य स्पर्धा जिंकणारी उर्वशी रौतेला कोट्यवधी रुपयांचे आलिशान घराची मालकीण आहे. तिच्याकडे अनेक महागड्या आणि आलिशान गाड्या देखील आहेत.
१५ व्या वर्षी जिंकली स्पर्धा
तिला मिस इंडिया, इंडियन प्रिन्सेस, मिस टुरिझम अशा अनेक किताबांनी सन्मानित करण्यात आले आहे. उर्वशी रौतेला चित्रपट, अल्बम, जाहिराती, वेब सिरीज आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर पैसे कमवते. ती एका म्युझिक व्हिडिओसाठी सुमारे ४० लाख रुपये घेते. ती एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपयांपर्यंत मानधन घेते. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला मुंबईत ज्या घरात राहते ते घर अनेक महागड्या इंटीरियर वस्तू आणि पेंटिंग्जने सजवलेले आहे. उर्वशीकडे कोट्यवधींचे घर आणि महागड्या गाड्या आहेत. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, उर्वशीचे स्वतःचे वैयक्तिक होम जिम देखील आहे. ज्यामध्ये एक लाउंज एरिया आणि एक सिनेमा हॉल देखील आहे. उर्वशी मुंबईत ज्या घरात राहते त्याची किंमत सुमारे २५ कोटी रुपये आहे.
महागड्या गाड्यांची मालकीन
उर्वशीकडे मर्सिडीज एस कूप एस ५००, रेंज रोव्हर इव्होक, फेरारी ४५८ स्पायडर सारख्या महागड्या गाड्या आहेत, ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे. उर्वशी सोशल मीडियावर सक्रिय आहे. उर्वशी रौतेला चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत राहते जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. तथापि, काही बोल्ड कंटेंटमुळे तिला अनेक वेळा ट्रोल केले जाते.












Click it and Unblock the Notifications