Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रंगीला गर्ल उर्मिलाची लव्हस्टोरी, 10वर्षांनी लहान मोहसीनशी धर्माच्या भिंती तोडून केलं होतं लग्न वाचा

Urmila Matondkar Love Affair, Marriage Divorce : धर्माच्या भिंती तोडून सिने जगतातली मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने नुकतेच आपण आपले पती मोहसीन अख्तर याच्याशी काडीमोड घेत असल्याचं जाहीर केलं आहे. आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या मोहसीनसोबत तिनं आठ वर्षांपुर्वी लग्न केलं होतं. तिनं घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानं आता 'रंगीला गर्ल'च्या आयुष्यातील एकतर्फी प्रेम, मग लग्न, धर्माच्या बेड्या तोडून लग्न केल्यानंतर झालेला वाद, आणि तिची लव्हस्टोरी सर्वच गोष्टींची नव्याने चर्चा होत आहे.

'रंगीला गर्ल' कोण तर उर्मिला मातोंडकर...90 च्या दशकात जन्मलेल्या कुणालाही विचारा... तो पटकन सांगेल. रंगीलातला तिचा समुद्रकिनाऱ्यावरचा शाँर्ट्स् घालून केलेला डान्स कित्येकांना प्रेमात पाडून गेला. त्याच उर्मिलाच्या चाहत्यांना आज अस्वस्थ वाटतंय. आठ वर्षांपासूनचा तिचा संसार आज मोडतोय. एक तर स्वतःपैक्षा तब्बल दहा वर्षांनी लहान असणाऱ्यासोबत तिनं लग्न केलं. त्यातही दोघांचे धर्म वेगवेगळे... हिंदू-मुस्लिम वादानं त्यावेळी उर्मिला चांगलीच ट्रोल झाली होती.

Urmila Matondkar Love Affair  Marriage Divorce

आता त्याच उर्मिलाच्या घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल झाल्यानंतर पुन्हा चर्चा वाढल्या. उर्मिला आणि तिचा काश्मिरी पती मोहसीन मोहसिन अख्तर मीर हे आता वेगळे होणार आहेत. मात्र या प्रेमकथेला सुरुवात कशी झाली, ती प्रेमकहाणी पूर्ण कशी झाली आणि ती आता का तुटतेय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहूयात...

2014 पासून सुरु होती प्रेमकहाणी

उर्मिलाचा पती मोहसिन हा काश्मिरी बिझनेसमन आहे. त्यानं कधीकाळी अभिनयही केला. 2007 मध्ये 'मिस्टर इंडिया'च्या स्पर्धेत त्याने तिसरं स्थान पटकावलं होतं. तर 2009 मध्ये तो 'लक बाय चान्स' या चित्रपटातही तो झळकला होता.

फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात 2014 मध्ये उर्मिला आणि मोहसिनची पहिली भेट झाली. उर्मिलाला पाहताच मोहसिन तिच्या प्रेमात आकंठ बुडाला. त्यानं तिला लग्नासाठी प्रपोज केलं, मात्र सुरुवातीला उर्मिलानं नकार दिला. तरीसुद्धा मोहसिन तिला भेटत राहिला. अखेर उर्मिलाने होकार देत 3 मार्च 2016 ला स्वतःच्या घरीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोहसिनशी लग्न केलं.

उर्मिला पन्नास वर्षांची

लग्नानंतर उर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारल्याची खूप चर्चा झाली. अखेर उर्मिलानंच एका मुलाखतीत असं काहीच नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. आठ वर्षानंतरही उर्मिला व मोहसिनचं लग्न तिचे चाहते विसरलेले नाहीत. सध्या उर्मिला पन्नास वर्षांची आहे. मात्र उर्मिलाने बाळाला जन्म दिला नाही.

तिला एका मिडिया हाऊसच्या मुलाखतीत याबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी मातृत्वाबद्दल ती म्हणाली होती, 'जेव्हा घडायचे आहे, ते घडेल. प्रत्येक स्त्री आई झालीच पाहिजे असं नाही. मला मुलं खूप आवडतात. पण इथे अनेक मुले आहेत ज्यांना आमच्या प्रेमाची आणि काळजीची गरज आहे. मुल फक्त तुमच्याच जन्माला आले पाहिजे असें नाही.'

मुंबईत घटस्फोटाचा अर्ज दाखल

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, 2016 मध्ये उर्मिला आणि मोहसिन यांनी लग्न केलं होते. आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिलाने मुंबई कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. उर्मिलाने बराच विचार करून हा निर्णय घेतला आहे. मात्र, घटस्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यासोबतच दोघांच्या संमतीने घटस्फोट होत नसल्याचेही बोलले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+