उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा! डायरेक्टरनं खोलीत नको ते.. त्या' साईटवर फोटो झाला होता लीक!
Urfi Javed's shocking revelation Casting couch from the director : सोशल मिडियावर प्रसिद्ध असलेली टीव्ही अभिनेत्री आणि तंग कपड्यांच्या वेगवेगळ्या फॅशन्समुळे प्रसिद्ध झालेली उर्फी जावेद ही सध्या जास्तच चर्चेत आहे. आपल्या कलेच्या जोरावर धांसू कमाई करणारी ही अभिनेत्री एका वक्तव्याने पुन्हा चर्चेत आली आहे. तिने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे, कास्टींग काऊचचा बेतलेल्या प्रसंगाबाबत तिने हा खुलासा केला आहे.
उर्फी जावेद लवकरच एका रिअलीटी शोमध्ये दिसणार आहे. प्राप्त माहितीनुसार, बाॅलीवूडचा दिग्गज फिल्म मेकर करण जोहर होस्टींग करणाऱ्या नवा रिअलीटी शो 'द ट्रेटर्स'मध्ये उर्फी दिसणार आहे. हा शो येत्या 12 जून 2025 पासून ओटीटी प्लॅटफार्म अॅमेझाॅन प्राईम व्हिडिओवर दिसेल. प्रत्येक गुरुवारी नवा भाग दाखवला जाणार आहे. या शोमध्ये उर्फीसोबत सुमारे 20 स्पर्धक असून स्पर्धा जिंकण्यासाठी एकमेकांना धोका द्यावा लागणार आहे असे वनइंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे.

उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा!
वनइंडिया हिंदीनुसार, उर्फी जावेदने सांगितले की, तिने प्रचंड मेहनतीने तिची वेगळी ओळख इंडस्ट्रीत निर्माण केली. त्यासाठी तिने खूप खस्ता खाल्ल्या, यानंतर उर्फी सांगते की, तिला कास्टींग काऊचचाही सामना करावा लागला.
नेमकी काय म्हणाली उर्फी जावेद?
उर्फी जावेद म्हणाली की, मी जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा ऑडीशन देताना तिच्यासोबत धोका झाला. ती गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा दिग्दर्शकाने तिला एका खोलीत बोलावले, तिला संधी हवी होती म्हणून ती गेली खरी पण झाले वेगळेच...तो दिग्दर्शक खोलीत एकटाच बसलेला होता. त्याने सांगितले की, "तू असे समज की मी तुझा प्रियकर आहे आणि तुला माझ्यासोबत इंटीमेट सीन्स द्यायचे आहेत " दरम्यान यावर उर्फी जावेद म्हणाली, "मी तेव्हा खोलीच्या चहुबाजूने बघितले तेव्हा खोलीच्या आत पुन्हा कोणतीही खोली नव्हती, मला काम आवश्यक होते म्हणून मी तो म्हणेल तसे मला करावे लागले, पण मी तेव्हा त्याच्या गालावर चपराक द्यायला हवी होती. "
घरमालकाकडून घाणेरडे शब्द
उर्फी म्हणाली, "मी त्या व्यक्तीसोबत इंटिमेट सीन्स शूट केले आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात एक मोठे वादळ आले. माझ्या घरमालकाने मला सर्वांसमोर घाणेरडे शब्द बोलले. पण आता लोकांमध्ये मला काहीही बोलण्याची हिंमत नाही आणि जर ते बोलले तर मला काही फरक पडत नाही आणि मी प्रत्येक गोष्टीचे योग्य उत्तर देते. दरम्यान उर्फीने असेही सांगितले की तिचा फोटोही अॅडल्ट साइटवर लीक झाला होता. अशा परिस्थितीत, तिच्या कुटुंबातील सदस्यांपासून ते नातेवाईकांपर्यंत, सर्वजण तिच्यापासून दूर गेले आहेत असेही ती म्हणाली.
उर्फी जावेद आपल्या फॅशनमुळे प्रसिद्ध असली तरीही अनेकांना तिची फॅशन फारशी रुचतेच असे नाही, अलिकडे भाजपच्या एका महिला नेत्याने तिच्यावर टीका केली होती त्यावरुन मोठा वादही वाढला होता. अशा विविध गोष्टींमुळे ही तारका बाॅलीवूडमध्ये चर्चेत राहते.


Click it and Unblock the Notifications
