सलमान खानच्या शूटिंग सेटवर घुसला व्यक्ती, म्हणाला- बिश्नोईला काय सांगू? भाईजानसाठी हे वर्ष धमक्यांचे
unknown man entered Salman Khan's shooting set : महाराष्ट्रात बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर सिद्दीकी यांचे मित्र बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सतत चर्चेत येत आहे. कारण सलमान खानला अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत, या धमक्या लाॅरेन्स बिष्णोई गँगने दिल्याचे सांगितले जात आहे. अशातच एक आणखी मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या शूटिंग सेटवर एक अनोळखी व्यक्तीने घुसखोरी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
सलमानसाठी हे वर्ष धमक्यांचे
सलमान खानसाठी 2024 हे वर्ष फारसे चांगले राहिले नाही. एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता, त्यामुळे त्याच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीने अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत, अशा घटना सलमान खानच्या टेन्शन वाढवणाऱ्या ठरल्या आहेत.

महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि सलमानचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. यानंतर सलमानला सतत धमक्या येत राहील्या. त्यातच शूटिंग साईटवर एक अनोळखी व्यक्ती घुसला होता, तर आता त्याचीच पुनरावृत्ती झाली. एक अनोळखी व्यक्ती सलमान खानच्या शूटिंग साईटवर बेकायदेशीरपणे घुसला , त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. म्हणजेच डिसेंबरच्या अखेरच्या महिन्यातही सलमानच्या सुरक्षेचा विषय चालूच आहे.
चौकशीत काय म्हणाला संशयीत?
सलमान खानच्या सेटवर घुसखोरी करणाऱ्या संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तो म्हणाला- मी बिश्नोईला सांगू का? या व्यक्तीला चौकशीसाठी मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
सलमानला Y+ श्रेणीची सुरक्षा
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला Y+ श्रेणीची सुरक्षा दिली जात आहे. त्याच वेळी, 12 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सलमान खानच्या अगदी जवळचे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, त्याच सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. यातच शूटिंग सेटवर अज्ञात व्यक्तीचा प्रवेश आणि लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेतल्याने सलमान खानच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन शूटर्सनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर सलमान खानचे कुटुंबीय तसेच त्याचे चाहते प्रचंड घाबरले आहेत. सलमान खानला खंडणीचे कॉल आले होते, मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची जबाबदारी सलमान खानने घेतली होती. यानंतर त्याला आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे फोन आले आणि अनेक पत्रेही पाठवण्यात आली. इतकंच नाही तर अभिनेत्याला खंडणीचे कॉलही आले आहेत, ज्यापैकी एकाने त्याच्याकडे 5 कोटींची मागणी केली होती.












Click it and Unblock the Notifications