अमिताभच्या जन्माची 'ही' भविष्यवाणी तुम्हाला माहिती आहे..? जन्मापूर्वीच वडिलांनी सांगितले होते की...
Amitabh Bachchan Birthday : आपल्याला मुलगा होईल, की मुलगी..? याचं भाकीत अमिताभच्या वडिलांना त्यांच्या जन्मापूर्वीच केलं होतं, असं कुणी सांगितलं, तर तुम्हाला खरं वाटेल का..? नाही ना... पण हे खरं आहे. अमिताभ बच्चन यांच्या जन्मापूर्वीचा किस्सा अमिर खानने सांगितलाय.
आज बाँलिवूडचे बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती- १४ होस्ट करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या चॅनलने एका विशेष भागाचे चित्रिकरण केले आहे. त्यात पाहुणा म्हणून आलेल्या अमीर खानने हरिवंशराय बच्चन यांनी लिहलेल्या कथानकाचा एक उतारा वाचून दाखवला. अमीर खानने अमिताभ बच्चनने यांच्या आयुष्यातील पडद्यामागच्या गोष्टींवर त्यांना बोलते केलं. याच गप्पांत अमिताभ यांनी त्यांच्या जन्माचा हा किस्सा समोर आला.

स्वतःच्या जन्माच्या प्रश्नावर अमिताभ गोंधळले
वाढदिवासानिमित्त या चॅनलने बिग बीचा वाढदिवस साजरा करत एक विशेष भाग प्रदर्शित केला. या विशेष शोमध्ये पाहुणा आलेला आमिर खानने हरिवंशराय बच्चन यांच्या आत्मचरित्रातील एक उतारा वाचून दाखवला. जिथे त्याने अमिताभ यांच्या जन्माची कथा कथन केली. हरिवंशराय बच्चन यांना माहित होते की तेजी बच्चन त्यांच्या वडिलांच्या अर्थात बिग बींचे आजोबा प्रताप नारायण श्रीवास्तव यांच्या रूपात बाळाला जन्म देतील. आपल्या वडिलांचा आत्माच आपल्या पोटी जन्म घेईल, असे हरिवंशराय बच्चन यांना वाटत होते. या उताऱ्याच्या अनुषंगाने आमीर खानने अमिताभ बच्चन यांना एक खास प्रश्न विचारला. "तुम्हाला तुमचा जन्म झाला तो दिवस आठवतो का?" यावर अमिताभ क्षणभर गोंधळलेले दिसले. अमिताभचे वडील, प्रख्यात कवी हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या जन्मावेळी महत्त्वाचे भाकीत केले होते, असे अमिताभ यांनी स्पष्ट केले.
हरिवंशराय यांना मुलगा होण्याची खात्री होती
आमिरने हरिवंशराय बच्चन यांच्या जीवनचरित्रातील एक उतारा वाचून दाखवला, "जेव्हा तेजीने (अमिताभ यांच्या आई) मला उठवले आणि सांगितले की तिला प्रसूती वेदना होत आहेत, तेव्हा वेळ शुभ वाटली. त्याचवेळी मला माझ्या वडिलांच्या आत्म्याचा भास झाला. मी प्रभावित झालो. मला काय भास झाला हे मी तेजीला सांगितले. माझ्या अर्धवट झोपेत मी तिला म्हणालो, 'तेजी, तुला मुलगाच होईल. माझ्या वडिलांचा आत्मा आपल्या मुलाच्या रूपाने आपल्या घरात येत आहे...'' हे ऐकून अमिताभ बच्चन भावूक झाले.
आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यांना अजिताभ बच्चन हा एक भाऊ आहे, हेही अनेकांना माहित नसावे. अजिताभ हे सध्या लंडनला स्वतःचा व्यवसाय सांभाळतात. लंडनला जाण्यापूर्वी अजिताभ यांनी भारतातही काही वर्षे आपल्या उद्योग सांभाळला. लंडनमध्ये सध्या ते एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून नावारुपाला आहेत.












Click it and Unblock the Notifications