या आहेत बांगलादेशच्या 5 टॉप अभिनेत्री! बॉलीवूडच्या सुंदरीही सौंदर्याच्या बाबतीत त्यांच्या मागे आहेत
भारतातील बॉलिवूड अभिनेत्रींचे त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी जगभरात कौतुक केले जाते.जगभरामध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या भारतातील अनेक अभिनेत्री आहेत. त्यामध्ये त्यामध्ये ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट यांसारख्या अभिनेत्रींनी जगभर आपली अभिनयाची जादू पसरवली आहे.
पण भारता शेजारील बांगलादेशच्या अभिनेत्री देखील भारतीय बॉलीवूड अभिनेत्री पेक्षाही सुंदर आहेत. बांगलादेशच्या 'या' अभिनेत्री स्टाईल आणि सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा सरस आहेत.जाणून घेऊया बांगलादेशच्या 'या'अभिनेत्रींबद्दल-

नुसरत फारिया
नुसरत फारिया ही बांगलादेशची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपरमॉडेल आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती गायिका, टीव्ही प्रेझेंटर आणि रेडिओ जॉकी देखील आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. तिच्या गॉर्जियस लूक आणि स्टाइलचे लोक वेडे आहेत. नुसरतने बंगबंधू यांच्या बायोपिक 'मुजीब: द मेकिंग ऑफ नेशन'मध्ये शेख हसीनाची भूमिका साकारली होती. सध्या ती अनेक चित्रपट करत असून त्यांचे शूटिंग सुरू आहे.
पोरी मोनी
पोरी मोनी ही बांगलादेशातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. पोरी मोनीच्या उत्कृष्ट अभिनयाचे लोकांना वेड लागले आहे. रोकटो आणि महुआ सुंदरी सारख्या चित्रपटांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. यानंतर तिची लोकप्रियता पाहण्यासारखी होती. या अभिनेत्रीचे नैसर्गिक सौंदर्य लोकांना खूप आवडते.
रफियथ रशीद मिथिला
रफियाथ रशीद मिथिला ही केवळ बांगलादेशातील अभिनेत्रीच नाही तर प्रसिद्ध गायिका देखील आहे. त्याचे चित्रपट बांगलादेश आणि कोलकाता येथे मोठ्या प्रमाणावर चालतात. रफियाथ रशीद मिथिलाने 2006 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे.
विद्या सिन्हा सहा मीम
विद्या सिन्हा साहा मीमने 2008 मध्ये बांगलादेशी चित्रपटांमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने सौंदर्य स्पर्धा लक्स चॅनल वन सुपरस्टार 2007 जिंकली. तिच्या अभिनयासोबतच ही अभिनेत्री तिच्या मनमोहक पद्धतीनं चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे
सादिया जहां प्रोवा
सादिया जहाँ प्रोवा ही बांगलादेशची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. तिने 2010 मध्ये अभिनेता जियाउल फारूकशी लग्न केले. मात्र, हे लग्न वर्षभरही टिकले नाही आणि 2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने 2012 मध्ये मेहमूदशी लग्न केले पण ते लग्नही 2014 मध्ये संपुष्टात आले. सादिया जहाँ प्रोवा टीव्हीसोबतच चित्रपटांमध्ये काम करते. ती बांगलादेशची प्रसिद्ध अभिनेत्री












Click it and Unblock the Notifications