Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चित्रपट अर्ध्यावरचं सोडणं हे पहिल्यांदाचं झालेलं नाही, परेश रावल यांनी ‘हा’ चित्रपटही सोडला होता

बॉलिवूडमध्ये सध्या 'हेरा फेरी 3' चर्चेचा विषय ठरला आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या गाजलेल्या त्रिकुटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हशांवर अधिराज्य गाजवण्याची तयारी केली होती. मात्र, बाबू भैय्या म्हणजेच परेश रावल यांनी अचानक या प्रोजेक्टमधून माघार घेतल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Paresh Rawal exits Hera Pheri 3


या निर्णयामुळेच अक्षय कुमारने त्यांच्यावर २५ कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली, अशीही माहिती समोर आली आहे. पण, हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही. याआधीही परेश रावल यांनी अक्षयसोबतचा एक महत्त्वाचा सिनेमा अर्ध्यात सोडला होता - 'OMG 2'.

'OMG 2'मधून देखील घेतली होती एक्झिट

'ओह माय गॉड' या चित्रपटामधील परेश रावल यांची भूमिका अत्यंत गाजली होती. त्यांच्या अभिनयामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या भागातही ते दिसतील, अशी अपेक्षा होती. पण 'OMG 2'मध्ये त्यांच्या जागी पंकज त्रिपाठी झळकले.

परेश रावल यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडताना सांगितले की, त्यांना 'OMG 2'ची स्क्रिप्ट आवडली नाही, त्यामुळे त्यांनी हा प्रोजेक्ट स्वीकारला नाही. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं, "मला अशी पटकथा आवडत नाही जी फक्त पहिल्या भागाच्या यशावर आधारित असते. सिक्वेलसाठी एक वेगळी, उठावदार गोष्ट असावी लागते."

मात्र, मानधन वाढवण्याची मागणीही होती?

जरी स्क्रिप्ट आवडली नसल्याचं कारण अधिकृतपणे दिलं गेलं असलं, तरी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये वेगळं चित्र समोर आलं. सूत्रांच्या मते, 'OMG 2'साठी परेश रावल हे निर्मात्यांची पहिली पसंती होते आणि बोलणीही सुरू झाल्या होत्या. पण परेश रावल यांनी अधिक मानधनाची मागणी केली. त्यांच्या मते, ते पहिल्या भागातील लीड कलाकार होते आणि चित्रपटाच्या यशात त्यांचा वाटा महत्त्वाचा होता, त्यामुळे त्यांना अधिक रक्कम मिळायला हवी होती.

मात्र, निर्मात्यांना वाटलं की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मानधन देणं शक्य नाही आणि बजेटवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच दोन्ही बाजूंनी परस्पर सहमतीने निर्णय घेत, परेश रावल प्रोजेक्टमधून बाहेर पडले.

'हेरा फेरी 3'मध्येही तोच पॅटर्न?

'हेरा फेरी 3'च्या संदर्भातही अशाच प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. सूत्रांनुसार, परेश रावल यांनी या सिनेमासाठी करारावर स्वाक्षरी केली होती आणि सायनिंग अमाऊंटही घेतली होती. पण त्यानंतर त्यांनी मानधन वाढवण्याची मागणी केली. ही परिस्थिती पाहता निर्मात्यांनी त्यांना बाजूला करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.

परेश रावलचं बदललेलं गणित?

बॉलिवूडमधील अनुभवी आणि दर्जेदार अभिनेता असलेल्या परेश रावल यांच्यासोबत काम करण्याची अनेक दिग्दर्शक-निर्मात्यांची इच्छा असते. मात्र, सध्या त्यांच्याकडून स्क्रिप्टवर अधिक लक्ष देणं, तसेच स्वतःच्या मार्केट व्हॅल्यूप्रमाणे मानधन मागणं ही गोष्ट वारंवार घडताना दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+