बापरे ! चोराने रात्रीच एक कोटी मागितले होते? सैफच्या हल्ला प्रकरणात आता धक्कादायक माहिती उघड
अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चाकूने हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात सुरुवातीला फक्त सैफ जखमी असल्याचे सांगितले गेले. मात्र त्याच्या घरातील दोन महिला कामगारही किरकोळ जखमी झाल्याचे तपासात समोर आले आहे. तपासात या प्रकरणात अजून धक्कादायक माहिती हाती आली असून, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीचा फोटोही व्हायरल केला आहे.

पोलिसांकडून तपास
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेची आठ पथके व मुंबई पोलिसांची सात पथके आरोपीचा शोध घेत आहेत. याशिवाय क्राइम इंटिलिजन्स युनिटही या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेवरुन आरोपीचा फोटो शोधला असून, त्या आरोपीचा शोधही सुरु आहे. आरोपी घरात कसा शिरला? हल्ला करून कसा बाहेर पडला? या सगळ्या गोष्टींचा तपास सुरू आहे. सुरक्षेसाठी असलेल्या शिडीवरून आरोपी घरात घुसला आणि त्याच शिडीवरून पळून गेला असा पोलिसांचा अंदाज आहे.
धक्कादायक माहिती समोर
सैफचा मुलगा जहांगिरची देखभाल करणाऱ्या नर्स एलियामाच्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एलियामाही हल्ल्यात किरकोळ जखमी आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरोपीने सुरुवातीला एक कोटी रुपयांची मागणी केली. आम्ही त्याला नकार दिला. तेवढ्यात आमच्या आवाजाने सैफ धावत आला. त्यानंतर झटापट झाली आणि आरोपीने त्यांच्यावर सपासप वार केले. सैफची दुसरी मोलकरीण लिमा यांचीही पोलिसांनी चौकशी केली.
आरोपीची ओळख पटली
पोलिस सूत्रांच्या माहितीप्रमाणे, घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असावेत. अशा प्रकारचे गुन्हे फक्त सराईत आरोपीच करू शकतात. हल्ल्याच्या वेळी डम डेटाच्या आधारे आरोपीची ओळख पटली, पोलिसांना त्या भागात कोणते मोबाईल नेटवर्क सक्रिय होते याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती आहे.












Click it and Unblock the Notifications