Year Ender 2024: पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांची जादू चालली, कमवला कोट्यवधीचा गल्ला
Year Ender 2024: चित्रपटसृष्टीसाठी 2024 हे वर्ष अतिशय चांगलं राहिलं आहे. त्याच वेळी काही चित्रपट देखील पुन्हा प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी थिएटरमध्ये चांगली कमाई केली. यात काही क्लासिक चित्रपटांचे पुनरागमन झाले आणि प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली.
यामध्ये शाहरुख खानचा 'कल हो ना हो', रणबीर कपूरचा 'रॉकस्टार', आणि सोहम शाहचा 'तुंबाड' हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले. यावर्षी हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. या वर्षीच्या री-रिलीज रेसमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सोहम शाहचा 'तुंबाड', या चित्रपटाने आपल्या अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली.

करण अर्जुन
1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या करण अर्जुन या ब्लॉकबस्टर चित्रपटाने 22 नोव्हेंबर 2024 रोजी पुन्हा रिलीज होऊन 29 वर्षे पूर्ण केली. राकेश रोशन यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपटही पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटाने केवळ 1 कोटींची कमाई केली आहे.
शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटाची भूमिका असलेला कल हो ना हो हा चित्रपट यावर्षी 15 नोव्हेंबरला पुन्हा थिएटरमध्ये दाखल झाला. भावनिक कथा, उत्तम अभिनय आणि गाण्यांमुळे आजही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडतो. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पुन्हा प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटाने पुन्हा एकदा त्याच जुन्या आठवणी प्रेक्षकांच्या हृदयात जाग्या करण्यात यश मिळवलं. या चित्रपटाने रि-रिलीजमध्ये 4.15 कोटींची कमाई केली होती.
रॉकस्टार
रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांचा 'रॉकस्टार' 17 मे 2024 रोजी पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला. रणबीरच्या या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. पुन्हा रिलीज दरम्यान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10.50 कोटीचा गल्ला जमवला.
लैला मजनू
9 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज झालेला 'लैला मजनू' इम्तियाज अलीने सादर केला होता. हा चित्रपट सज्जाद अली यांनी दिग्दर्शित केला होता. अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी यांच्या या चित्रपटाने पहिल्या रिलीजपेक्षा प्रेक्षकांच्या हृदयावर खोलवर छाप सोडली होती. री-रिलीजमध्ये या चित्रपटाने 11.5 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
तुंबड
2024 च्या या वर्षीच्या रि-रिलीज चित्रपटांची शर्यतीत 'तुंबाड' या चित्रपटाने बाजी मारली आहे. सोहम शाह अभिनीत या चित्रपट एका खेड्यातील खजिन्याची आणि त्यामागे दडलेल्या लोभ आणि शापाची कथा आहे. सोहम शाहने विनायकची भूमिका साकारली होती. 2018 मध्ये 5 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी फक्त 15 कोटी कमावले होते. पण रि-रिलीजमध्ये या चित्रपटाने 38 कोटी रुपायांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आता चित्रपटाची एकूण कमाई 53 कोटी झाली आहे.












Click it and Unblock the Notifications