हा प्रसिद्ध अभिनेता अडकला ड्रग्सच्या विळख्यात; पोलिसांनी केली अटक, वाचा संपूर्ण प्रकरण काय?
Tamil actor Srikanth arrested in drug case : प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी ड्रग्जच्या विळख्यात अडकला होता. त्याला अटक झाली त्यानंतर बाप म्हणून शाहरुखने त्याला सोडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. ते प्रकरण माध्यमांमध्ये चांगलेच गाजले होते.
दरम्यान, आता आणखी एक लोकप्रिय अभिनेता ड्रग्ज संदर्भातील प्रकरणात अडकला आहे. तर पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयाने त्याला 7 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोणता अभिनेता अडकला ड्रग्जच्या विळख्यात!
मिळालेल्या माहितीनुसार, तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध तथा लोकप्रिय अभिनेता श्रीकांत सद्या गंभीर कायदेशीर अडचणीत अडकला आहे. ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुमारे 8 तासांच्या सखोल चौकशीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
श्रीकांतला 7 जुलै 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, श्रीकांतचा रक्ताचा नमुना तपासणीसाठी किलपॉक मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला. वैद्यकीय अहवालात अभिनेत्याच्या शरीरात ड्रग्ज असल्याचे सिद्ध झाले.

माजी एआयएडीएमके नेता कोठडीत
या आधारावर, श्रीकांतला एग्मोर येथील 14 व्या महानगर दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आणि रिमांडवर घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी माजी अण्णाद्रमुक नेते टी प्रसाद यांना ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानंतर अभिनेता श्रीकांत आणि आणखी एका कलाकाराचीही नुंगमबक्कम पोलिस स्टेशनमध्ये चौकशी झाली.
11 ग्रॅम ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त!
टी प्रसाद यांनी या कलाकारांना कोकेन पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी पोलिसांनी गेल्या आठवड्यात सेलम येथून प्रदीप कुमार नावाच्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घानाचा नागरिक जॉन याला तामिळनाडूच्या होसूर भागातून अटक केली. ज्याच्याकडून सुमारे 11 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. अभिनेता श्रीकांत या टोळीशी जोडला गेल्याचे देखील काही पुरावे सापडले आहेत.
श्रीकांतची कशी राहिली चित्रपट कारकीर्द!
- श्रीकांतचे नाव तमिळ चित्रपटसृष्टीतील त्या कलाकारांमध्ये समाविष्ट आहे, ज्यांनी दीर्घकाळ अनेक संस्मरणीय पात्रे साकारली आहेत.
- त्यांनी 1999 मध्ये 'जन्नल-मारबू कविताईगल' या टीव्ही शोमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
- यानंतर त्यांनी काना कांडेन, ओरू नाल कनावू, बंबारा कन्नाले, मर्क्युरी पूक्कल, पू, सथुरंगम, नानबन आणि वरंजलम यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले.
- श्रीकांतच्या अलिकडच्या रिलीज झालेल्या चित्रपटांमध्ये कोंजम कधल कोंजम मोधल आणि तेलुगू चित्रपट एर्राचेरा यांचा समावेश आहे.
- आता हे प्रकरण कोणते वळण घेते आणि श्रीकांतवरील आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. सद्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications