उस्ताद झाकीर हुसेन होते करोडोंचे मालक, पहिल्या परफॉर्मन्ससाठी मिळाले होते 5 रुपये
Ustad Zakir Hussain Net Worth : प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे 15 डिसेंबर रोजी निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्यावर सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 1951 मध्ये जन्मलेल्या उस्ताद झाकीर हुसेन यांचे तबला वादनाचे जगभरात चाहते आहेत. त्यांना लहानपणापासूनच तबला वाजवण्याची आवड होती.
झाकीर हुसेन यांनी वयाच्या 11 व्या वर्षी पहिला कॉन्सर्ट केला होता. त्यानंतर त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी अमेरिकेत परफॉर्म केला होता. जिथे त्यांना 5 रुपये मिळाले होते. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर त्याची एकूण संपत्ती $1 दशलक्ष आहे. जी भारतीय चलनानुसार 8.48 कोटी रुपये आहे. झाकीर हे त्याच्या एका कॉन्सर्टसाठी 5 ते 10 लाख रुपये फी घेत होते.

तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले
झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले आहेत. याशिवाय भारत सरकारने त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केले आहे. झाकीर हुसेन यांना पहिल्यांदा परफॉर्म केल्याबद्दल 5 रुपये मिळाले होते. याविषयी ते एका मुलाखतीत म्हणाला होते की, मी माझ्या आयुष्यात खूप पैसे कमावले आहेत, पण मला मिळालेले 5 रुपये सर्वात मौल्यवान होते. झाकीर हुसेन यांनी तबला वाजवण्यासोबतच अभिनयही केला आहे. 1983 मध्ये आलेल्या ब्रिटिश चित्रपट Heat and Dust मध्ये त्यांनी काम केले होते. या चित्रपटात शशी कपूरही होते.
अमेरिकेत ही होता उस्तादांचा सन्मान
झाकीर हुसेन यांचा भारत जेवढा सन्मान केला जातो तेवढाच अमेरिकेतही त्यांचा सन्मान होता. 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. हे आमंत्रण मिळालेले ते पहिले भारतीय संगीतकार होते.












Click it and Unblock the Notifications