Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

झाकीर हुसैन यांची तबल्याची थाप हृदयस्पर्शी, ज्याने ऐकले ते म्हणाले - वाह उस्ताद वाह! वाचा खास गोष्टी

Tabla maestro zakir hussain : संगीत क्षेत्रातील लोकप्रिय नाव, पद्मविभूषण आणि प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन हे 15 डिसेंबरला जग सोडून निघून गेले. त्यांचे वयाच्या 73 व्या वर्षी सॅन फ्रान्सिस्को येथे इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे निधन झाले. सोमवारी त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृत निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती देण्यात आली.

देशातील लोकप्रिय कलाकार संगीत रत्नांपैकी एक तबला वादक झाकीर हुसेन यांची रविवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि संध्याकाळी ते गंभीर असल्याची बातमी आली. त्यांचे मित्र बासरीवादक राकेश चौरसिया यांनी पीटीआयला सांगितले होते की झाकीर हुसेन यांची प्रकृती खूप बिघडली होती आणि त्यांचे कुटुंबीय यामुळेच खूप चिंतेत होते.

tabla maestro zakir hussain

झाकीर हुसैन हे संगीत जगतातील एक तारा, त्यांचे तबलावादन आणि लाईव्ह काॅन्सर्ट म्हणजे मेजवानीच असायची. त्यांच्या कलागुणांचा देशाने योग्य सन्मानही केला. त्यांच्या कलेचे शब्दात व्याख्या करणे केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे.

तबल्याचा जादूगार

उस्ताद झाकीर हुसेन यांचे जीवनचरित्र

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जेव्हा तबला या वाद्य प्रकाराचे नाव घेतले जाते तेव्हा उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येते. आपल्या कलेने त्यांनी तबल्याला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात वेगळी ओळख मिळवून दिली. तबल्यावर त्यांच्या बोटांतून निघणारे सूर मनात रुंजी घालत असायचे. त्यांचे लाखो, करोडो चाहते आहेत. त्यांनी वादन केलेला तबला जो कुणी ऐकायचा त्या तबल्याची थाप ऐकणारा 'वाह उस्ताद वाह.' असे म्हटल्याशिवाय राहत नव्हता.

हेही वाचा : Zakir Hussain : तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन, वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या खास गोष्टी

  • उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी महाराष्ट्रातील मुंबई शहरात झाला. त्यांचे वडील उस्ताद अल्ला रख खान हे तबल्याचे उत्तम ज्ञानी होते त्यांनीच आपल्या मुलाला तबल्याचे सर्व ज्ञान शिकवले.
  • झाकीर हुसेन यांना संगीताचा वारसा मिळाला पण त्यांनी आपल्या प्रतिभेने ते नव्या उंचीवर नेले. त्यांनी लहान वयातच वडिलांकडून तबल्याचे औपचारिक धडे घ्यायला सुरुवात केली.
  • झाकीर हुसैन यांनी तरुण वयातच करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी स्टेज प्रोग्राम करायला सुरुवात केली. त्यांनी आपली प्रतिभा केवळ भारतीय शास्त्रीय संगीतातच नाही तर पाश्चात्य संगीतातही सिद्ध केली.
  • यो-यो मा, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट यांसारख्या प्रसिद्ध पाश्चात्य कलाकारांसोबत शो केल्यावर त्यांची आंतरराष्ट्रीय ओळख झाली.

पुरस्कार

  • झाकीर हुसैन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत.
  • पद्मश्री 1988, 2002 मध्ये त्यांनी पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण ही पदवी देण्यात आली.
  • ग्रॅमी अवॉर्ड (1992), जो त्याला 'प्लॅनेट ड्रम्स' अल्बमसाठी मिळाला.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

  • मृगया आणि इन कस्टोडिया डेल कॉन्डोर या चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  • भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा अतुलनीय संगम ते "शक्ती" या जगप्रसिद्ध बँडचे सह-संस्थापक देखील आहेत. ज्यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा अतुलनीय संगम पाहायला मिळतो.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+