Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : रणवीर अल्लाबदियाच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती! शो करण्यास मनाई

Supreme Court stays Ranveer Allabadia's arrest : 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या नुकत्याच झालेल्या एका भागादरम्यान केलेल्या अश्लील आणि असभ्य टिप्पणीबद्दल दाखल गुन्ह्यात रणवीर अल्लाबदियाच्या अटकेला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिली आहे. मात्र, त्याला शो करण्यास न्यायालयाने मनाई केली.

YouTuber रणवीर अल्लाबदुयाविरुद्ध महाराष्ट्र, आसाम आणि राजस्थानमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यानंतर रणवीरने अटक होऊ नये म्हणून कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर रणवीर अल्लाबडियाच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी स्थगिती दिली आहे.

Supreme Court stays Ranveer Allabadia s arrest

तत्पूर्वी अल्लाबदिया यांनी आपल्याविरुद्ध दाखल विविध एफआयआर एकत्र करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आणि अंतरिम संरक्षणाची मागणी केली होती. न्यायालयाने अंतरिम संरक्षणास परवानगी दिली परंतु अल्लाबदिया (याचिकाकर्ता) यांना सर्व प्रकरणांच्या तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आणि त्याला सध्या इतर कोणताही शो करण्यास मज्जाव केला. यासंदर्भात 'बार अँड बेंच'ने वृत्त दिले आहे.

अटी-शर्तीवर अटकेला स्थगिती

मुंबई आणि गुवाहाटीत दाखल झालेल्या एफआयआर अंतर्गत याचिकाकर्ता अल्लाबदियाच्या अटकेला स्थगिती दिली जाईल पण जेव्हा बोलावले जाईल तेव्हा पोलिसांना तपासात सहकार्य करावे लागेल अशी अट याचिकाकर्त्याला घालण्यात आली. यासह पोलिस ठाण्यात कोणत्याही वकिलाशिवाय पूर्ण सहकार्य करावे लागेल या आधारावर अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले जाते," न्यायालयाने आदेश दिले आहेत.

शो करण्यास न्यायालयाकडून मज्जाव

अटकेवर स्थगिती देताना याचिकाकर्ता अल्लाबदिया यांना कोणताही शो करण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. अटींच्या अधीन राहून याचिकाकर्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सध्यातरी इतर कोणतेही शो करू नयेत, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. विशेष म्हणजे, वादग्रस्त भाग आणि शोमध्ये त्यांनी केलेल्या टिप्पणीबद्दल अलाहबादियाविरुद्ध आणखी एफआयआर नोंदवू नये, असा आदेशही न्यायालयाने दिला.

एफआयआरचे कारण असलेल्या लेटेंट शोच्या आधारे त्याच्याविरुद्ध पुढील एफआयआर नोंदविला जाणार नाही; अलाहबादियाला तपासात सहभागी होण्यास अडथळा निर्माण झाल्यास जीव व स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्र आणि आसामच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचे स्वातंत्र्य असेल तसेच जयपूरमध्ये इतर कोणतीही एफआयआर नोंदवली असल्यास, त्या एफआयआरमध्येही अटक कायम राहील. अलाहाबादियाने त्याचा पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याने देश सोडू नये आणि अलाहाबादिया आणि त्यांचे सहकारी सध्या इतर कोणतेही शो करणार नाहीत हे कोर्टाकडून नमूद करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीर अल्लाबदियाने एका शो दरम्यान अश्लील विनोद केले होते. यावर लोकांनीही तिखट प्रतिक्रिया दिल्या आणि त्याच्यावर अश्लीलतेचा आरोप करत अनेक तक्रारी दाखल केल्या. रणवीर अल्लाबदियाची अश्लील टिप्पणी दरम्यान, मुंबई पोलिसांनी रणवीर अल्लाबदिया आणि समय रैना यांना सध्या सुरू असलेल्या वादाच्या संदर्भात चौकशीसाठी समन्स पाठवले होते. दरम्यान रणवीर अल्लाबदिया अडचणीत आला. केंद्र सरकारच्या नोटीसनंतर, यूट्यूबने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोचा वादग्रस्त भाग काढून टाकला आहे. यादरम्यान विविध ठिकाणी रणवीर अल्लाबदियावर एफआयर नोंदवले गेले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+