Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बातमी मागची बातमी..! 'संध्या'थिएटर प्रकरण नेमकं काय..? झुकेगा नही साला, झुकला कसा..?

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुनला आज हैदराबाद पोलिसांनी अटक केली. 'पुष्पा २'च्या प्रीमिअर शोदरम्यान संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या आहेत. अल्लू अर्जुनला अटक झाल्याची माहिती आहे.

Allu Arjun

काय होता अल्लू अर्जुनवर गुन्हा

आरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत दोन चाहत्यांचा मत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत अभिनेता अल्लू अर्जुन, त्याचं सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून या प्रिमिअरसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती, असा आरोप स्वतः पोलिसांनी केला होता.

चेंगराचेंगरीत झाला होता महिलेचा मृत्यू

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये करण्यात आलं होतं. रात्री 9.30 च्या सुमारास अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या वैयक्तिक सुरक्षेसह थिएटरमध्ये आला. तेव्हा तिथे जमलेल्या लोकांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाने या लोकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी मोठा जमाव खालच्या बाल्कनीत घुसला. या गर्दीत रेवती आणि तिचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज यांचा श्वास गुदमरला. त्यानंतर लगेचच ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना खालच्या बाल्कनीतून बाहेर काढले. पोलिसांनी अंत्यवस्थ अवस्थेतील या दोघांना तातडीने जवळच्या दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या मुलाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

याप्रकरणानंतर मृत रेवती यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक, अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याची सुरक्षा टीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. महिलेच्या मृत्यूप्रकरणी आता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं पोलीस उपायुक्त म्हणाले. अल्लू अर्जुन आणि चित्रपटातील इतर कलाकार कोणत्या वेळी त्याठिकाणी येतील, याबद्दलची माहिती थिएटर व्यवस्थापकांकडून किंवा कलाकारांच्या टीमकडून पोलिसांना देण्यात आली नव्हती. इतकंच काय तर थिएटर मॅनेजमेंटने गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केली नव्हती. थिएटर व्यपस्थापनाला कलाकारांच्या येण्याची माहिती असतानाही त्यांच्यासाठी वेगळा प्रवेश किंवा जाण्यासाठी वेगळा मार्ग केला होता, अशी माहिती चिक्कडपल्ली पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर बी. राजू नाईक यांनी दिली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+