अभिनेता अल्लू अर्जुन व राम चरण यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, अतिशय जवळच्या व्यक्तीचे निधन!
Allu Arjun latest news : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि राम चरण यांची आजी अल्लू कनकरत्नम गरु यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर निधनाची वार्ता कळताच दोन्ही अभिनेत्यांनी थेट हैदराबाद गाठले आहे.
शूटिंग सोडून हैदराबादला परतले
आपल्या आजीच्या निधनाची बातमी समजताच, अल्लू अर्जुनने मुंबईतील आगामी चित्रपटाचे शूटिंग रद्द केले आणि लगेच हैदराबादला परतला. त्याचप्रमाणे, म्हैसूरमध्ये शूटिंग करत असलेला राम चरणही तात्काळ हैदराबादला परत आला. कुटुंबाच्या या दु:खाच्या काळात एकत्र राहण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

अंत्यसंस्कार आणि कुटुंबाचा सहभाग
अल्लू कनकरत्नम यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अरविंद निवास येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचे नातू आणि जावई चिरंजीवी हे सर्व अंत्यसंस्काराची व्यवस्था स्वतः पाहत आहेत.
आज दुपारी कोकापेट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या दु:खद प्रसंगी अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पवन कल्याण आणि नागा बाबू हेही श्रद्धांजली वाहण्यासाठी हैदराबादला येणार आहेत.
— Nehasharmanewsbytes (@nehuvk) August 30, 2025
एका युगाचा अंत
अल्लू कनकरत्नम यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीतील एका प्रतिष्ठित कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला आहे. त्यांचे योगदान आणि कुटुंबातील त्यांचे स्थान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याची भावना संपूर्ण उद्योगात व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications