ना मुलगा, ना पत्नी, ना बहीण 'या' व्यक्तीच्या हातात गेला संजय कपूरचा 31,000 कोटींचा व्यवसाय
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, संजय कपूर यांनी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना चुकून मधमाशी गिळली होती, ज्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले.

19 जून 2025 रोजी दिल्लीत संजय कपूर यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा 15 वर्षांचा मुलगा कियान कपूर याने आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या सर्व धार्मिक विधी पार पाडले आणि मुखाग्नी दिला.
कोट्यवधींची संपत्ती आणि व्यवसाय
संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्ती आणि व्यवसायावर कोणाचा हक्क असेल, याविषयी चर्चा सुरू आहे. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की या प्रचंड संपत्तीचा वारसदार कोण असेल.
'सोना कॉमस्टार'च्या चेअरमनपदी नवीन नाव
संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या कंपनी सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स लिमिटेड (Sona Comstar) चा नवीन चेअरमन नियुक्त करण्यात आला आहे. माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार, जेफरी मार्क ओव्हरली यांना कंपनीचा चेअरमन बनवण्यात आलं आहे.
पूर्वी अशी शक्यता व्यक्त केली जात होती की संजय कपूर यांच्या बहिणी मंधिरा कपूर आणि सुपर्णा मोटवानी यांना कंपनीची जबाबदारी दिली जाईल, परंतु 31,000 कोटी रुपयांच्या या उद्योगावर अखेर दुसऱ्याच व्यक्तीचा अधिकार बसला.
कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेली माहिती
सोना कॉमस्टारने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या फाइलिंगमध्ये स्पष्ट केलं आहे की, कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने जेफरी मार्क ओव्हरली यांची चेअरमनपदी नियुक्ती केली आहे. ओव्हरली 12 फेब्रुवारी 2021 पासून कंपनीचे स्वतंत्र संचालक आहेत.
कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की दिवंगत संजय कपूर यांना चेअरमन एमेरिटस पदाने गौरवण्यात आले होते. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे कंपनीवर अमीट ठसा उमटला आहे.
तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर यांना मिळाली नवी भूमिका
कंपनीने संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांची एडिशनल नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. प्रिया याआधी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी लंडनमधील क्रेडिट सुइस फर्स्ट बोस्टनमध्ये एम अँड ए अॅनालिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्या ऑटोमोटिव्ह रिटेल, विमा आणि फॅशन क्षेत्रात काम केलं आहे.
जेफरी मार्क ओव्हरली कोण आहेत?
जेफरी मार्क ओव्हरली यांनी सिनसिनाटी विद्यापीठातून इंडस्ट्रियल मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यांना व्यवसाय क्षेत्रात 43 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी जनरल मोटर्स आणि डेल्फी कॉर्पोरेशनसारख्या कंपन्यांमध्ये 25 वर्षे वरिष्ठ अभियंता म्हणून काम केलं आहे.
सोना कॉमस्टार कंपनी काय करते?
1995 मध्ये स्थापन झालेली सोना कॉमस्टार ही भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी कंपनी आहे. या कंपनीचे अमेरिका, सर्बिया, मेक्सिको आणि चीनमध्ये प्लांट्स, असेंब्ली सेंटर्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स आहेत. कंपनीचा एकूण बाजारभांडवल 31,000 कोटी रुपयांहून अधिक आहे.
करिश्मा कपूर आणि मुलांना काहीच मिळालं नाही
संजय कपूर यांच्या 31,000 कोटींच्या व्यवसायात त्यांच्या माजी पत्नी करिश्मा कपूर आणि त्यांच्या मुलांना - समायरा आणि कियान यांना काहीही मिळालं नाही. इतकंच नव्हे तर संजय कपूर यांची 13,000 कोटींची व्यक्तिगत संपत्ती सुद्धा करिश्मा कपूर किंवा त्यांच्या मुलांना मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. या संपत्तीवर संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव आणि त्यांच्या मुलांचा हक्क राहणार आहे.
करिश्मा कपूरला मिळालेली एलिमनी
2016 मध्ये अनेक कायदेशीर आणि वैयक्तिक संघर्षांनंतर करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा परस्पर सहमतीने घटस्फोट झाला. या सेटलमेंटमध्ये संजय कपूर यांनी करिश्मा कपूरला 70 कोटी रुपये दिले होते. तसेच आपल्या दोन्ही मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बॉण्ड्स घेऊन दिले होते.
तसेच करिश्मा कपूरला संजय कपूर यांच्या वडिलांचं घरही मिळालं होतं आणि दरमहा 10 लाख रुपये भत्ताही दिला जात होता. सध्या करिश्मा कपूर आपल्या दोन्ही मुलांची एकटीच जबाबदारी घेत आहे आणि त्यांना उत्तम जीवन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.












Click it and Unblock the Notifications