"तो चांगला नवरा नाही"; गोविंदाच्या पत्नी सुनीता आहुजा यांचा पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा!
Sunita Ahuja Slams Govinda : बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक चर्चा आणि अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत, विशेषतः त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी नुकताच जोर धरला होता. मात्र, सुनीता आहुजा यांनी या सर्व अफवांचे स्पष्टपणे खंडन केले आहे.
विभक्त होण्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. याच दरम्यान, एका मुलाखतीत सुनीता यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि गोविंदाच्या स्वभावाबाबत अनेक धक्कादायक आणि स्पष्ट खुलासे केले आहेत.

"गोविंदा चांगला मुलगा, पण चांगला नवरा नाही"
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी गोविंदाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अत्यंत परखड मत मांडले सुनीता म्हणाल्या, "गोविंदा एक उत्तम मुलगा आणि चांगला भाऊ आहे, पण तितका चांगला नवरा नाही." त्यांनी हेही कबूल केले की प्रत्येकजण त्यांच्या तारुण्यात चुका करतो. "मी चुका केल्या आहेत आणि गोविंदाही करतो. पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे या चुका कमी आकर्षक वाटतात." सुनीता यांच्या मते, जेव्हा एखाद्याचे कुटुंब, पत्नी आणि मुले सुंदर असतात, तेव्हा नातेसंबंध जोपासणे आणि त्यांचे महत्त्व समजून घेणे खूप महत्वाचे ठरते.
"एका हिरोची पत्नी असणे सोपे नसते"
बॉलीवूड स्टारची पत्नी असण्याचे आव्हान किती मोठे असते, याबद्दलही सुनीता आहुजा यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, "तो एक हिरो आहे, त्यामुळे तो त्याच्या पत्नीपेक्षा नायिकांसोबत जास्त वेळ घालवतो." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, एका स्टारची पत्नी होण्यासाठी, तुमचे हृदय दगडासारखे कठोर असावे लागते. या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी त्यांना तब्बल ३८ वर्षे लागली, असे त्यांनी सांगितले.
पुढच्या आयुष्यात 'मुलगा' म्हणून परत ये!
आपल्या वैवाहिक जीवनातील कटू अनुभवांवरून सुनीता यांनी गोविंदाला अत्यंत भावनिक आवाहन केले. त्या म्हणाल्या, "मी गोविंदाला स्पष्टपणे सांगितले आहे की तुझ्या पुढच्या आयुष्यात, पती म्हणून नाही, मुलगा म्हणून परत ये. सात जन्म विसरून जा, हे एक आयुष्य पुरेसे आहे." सुनीता यांनी स्पष्ट केले की, आता त्यांची मुले त्यांच्या आयुष्यात त्यांची मुख्य प्राथमिकता आहेत आणि तीच त्यांच्या जगण्याचे कारण आहेत.
नात्यात फरक, पण विभक्त होणे नाही
या सर्व धक्कादायक खुलासे आणि मतभेदांनंतरही सुनीता आहुजा यांनी त्यांच्या नात्याची सध्याची स्थिती स्पष्ट केली. त्यांनी कबूल केले की त्यांच्या आणि गोविंदा यांच्यात विचारसरणीत फरक आहे आणि त्यांचे नाते चढ-उतारांनी भरलेले आहे. मात्र, त्यांनी हे स्पष्ट केले की दोघांमध्ये घटस्फोट किंवा वेगळे होण्याचा कोणताही प्रश्न नाही आणि ते आजही एक कुटुंब म्हणून एकत्र आहेत.












Click it and Unblock the Notifications