‘माझी बहीण लढवय्या होती, पण..'; प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावेची भावनिक पोस्ट!
Subodh Bhave emotional post on Priya Marathe death news : 'पवित्र रिश्ता' आणि 'तुझेच मी गीत गात आहे' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ती या आजाराशी झुंज देत होती. तिच्या निधनामुळे मराठीसह हिंदी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट लिहून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
सुबोधने प्रियाला आपली चुलत बहीण संबोधले आणि तिच्या निधनामुळे त्याला झालेल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली.

'तिची ताकद कमी पडली..'
सुबोध भावेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रिया त्याच्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, तर ती त्याची चुलत बहीण होती. त्याने तिच्या कामावरच्या श्रद्धेचे आणि मेहनतीचे खूप कौतुक केले. 'प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली,' असे त्याने नमूद केले.
त्याने पुढे लिहिले की, काही वर्षांपूर्वी प्रियाला कर्करोगाचे निदान झाले. तिने त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा काम सुरू केले. 'तू भेटशी नव्याने' या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या कठीण काळात तिचा जोडीदार शंतनू मोघे तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. 'माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली', अशा भावना व्यक्त करत सुबोधने आपल्या बहिणीला श्रद्धांजली वाहिली.
प्रियाचा प्रवास आणि कारकीर्द
प्रिया मराठेने 'या सुखांनो या' या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 'चार दिवस सासूचे' आणि इतर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले.
हिंदी टेलिव्हिजनमध्ये तिने 'कसम से' मधून पाऊल ठेवले आणि 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेत 'वर्षा'ची भूमिका साकारली, जी खूप गाजली. ती 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतही दिसली होती. प्रियाने २४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेता शंतनू मोघेसोबत लग्न केले होते. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications