'हम होंगे कंगाल एक दिन',वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कामराचा नवा व्हिडिओ समोर, पुन्हा केली टीका

Kunal Kamra new Video: प्रसिध्द स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराच्या विधानामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलेच तापलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वक्तव्यामुळे तो शिवसैनिकांच्या निशाण्यावर आहेत. बीएमसीने कारवाई करत 'द हॅबिटॅट' ही इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे, जिथे कुणाल कामराने त्या विडंबन गाण्याचा व्हिडिओ शूट केला होता.

एवढेच नाही तर कामराने एक निवेदन जारी करून माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे, एवढेच नाही तर त्यांने मुंबई पोलिसांकडून आपली बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागितला आहे. सोशल मीडियावर त्याला सतत ट्रोल केले जातं आहे.

kunal kamra shared new video

टीकेच्या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने त्याच्या सोशल अकाउंटवर एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये तो पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका करत आहे. या व्हिडिओचे बोलही असे आहेत की, त्यामुळे पुन्हा आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या गाण्यात सुरू असलेल्या व्हिडिओमध्ये 'द हॅबिटॅट' इमारत पाडत असतानाचा एक भाग दाखवला आहे. कामराचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेतही उपस्थित झाला होता. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे. तसेच शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी अशा व्हिडिओंवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते.

उद्धव ठाकरेंनी घेतली कामराची बाजू

त्याच वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामराची बाजू घेत त्याला समर्थन दिले आहे. ठाकरे म्हणाले की, 'त्याने काहीही चूक केलेली नाही.' तसेच शिवसेना (यूबीटी) गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, 'महाराष्ट्रात जे घडत आहे ते योग्य नाही. कामराने त्याच्या व्यंगचित्रात शिंदे यांचे नावही घेतले नाही, ही कसली असहिष्णुता आहे?

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'एखाद्याची थट्टा करणे चुकीचे नाही, पण त्याला मर्यादा आहेत.' कुणाल कामराने सुपारी घेऊन हे केले आहे, असे दिसते. त्याने त्याच्या मर्यादेत राहावे, अन्यथा प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा कोण आहे?

कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आहे. जो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. 3 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईत जन्मलेल्या कामराने जय हिंद कॉलेजमध्ये कॉमर्सचा अभ्यास सुरू केला पण कॉलेजमध्ये रस नसल्याने त्याने आपले शिक्षण सोडून दिले.त्यानंतर जाहिरात चित्रपट निर्मिती गृह कॉर्कोइस फिल्म्समध्ये सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि 11 वर्षे तिथे काम केले.

"शट अप या कुणाल" या युट्यूब शो मुळे मिळालं यश

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सर्वात मोठे यश त्याच्या "शट अप या कुणाल" (2017) या YouTube शोने मिळाले, जो खूप लोकप्रिय झाला. दरम्यान कामरा नेहमीच वादांशी जोडला गेला आहे. त्याच्या व्हिडिओंमुळे वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+