सुपरस्टार रजनीकांत आहेत करोडो संपत्तीचे मालक, जाणून घ्या कार कलेक्शनसह एकूण संपत्ती
Rajinikanth Net Worth: साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचे केवळ दक्षिणेतच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक चाहते आहेत. अभिनेता रजनीकांत यांचा आज 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. ते आता 74 वर्षाचे झाले आहेत. या खास प्रसंगी आम्ही रजनीकांत यांच्या एकूण कमाई सांगणार आहोत.
रजनीकांत यांची एकूण संपत्ती
रिपोर्टनुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती 430 कोटी रुपये आहे. या त्यांनी आपल्या करिअरमध्ये केवळ साऊथमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशा परिस्थितीत रजनीकांत यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात महागड्या स्टार्समध्ये केली जाते. रजनीकांत एका चित्रपटासाठी 50 कोटी रुपयांपर्यंत फिस घेतात.

रजनीकांत हे सुपरस्टार असून प्रचंड संपत्तीसोबतच त्यांचा चेन्नईमध्ये एक आलिशान बंगलाही आहे. रिपोर्टवरनुसार या बंगल्याची किंमत 35 कोटी रुपये आहे. याशिवाय ते एक मॅरेज हॉल देखील चालवतात. ज्याची किंमत 20 कोटी रुपये आहे. या सोबतच रजनीकांत यांना महागड्या गाड्यांचाही शौक आहे.
रजनीकांत यांचे कार कलेक्शन
रजनीकांत यांच्याकडे दोन रोल्स रॉयस कंपनीच्या अलिशान गाड्या ही आहेत. त्यापैकी एक रोल्स रॉयस घोस्ट आहे. तिची किंमत 6 कोटी रुपये आहे. दुसरी गाडी रोल्स रॉयस फँटम आहे. तिची किंमत 16.5 कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर रजनीकांत यांच्याकडे 1.77 कोटी रुपयांची BMW X5, 2.55 कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ जी वॅगन आणि एक लॅम्बोर्गिनी उरूसही आहे.
गरजू विद्यार्थांना करतात मदत
रजनीकांत यांची संपत्ती करोडोंमध्ये आहे. पण या कमाईतील काही भाग तो गरजू लोकांना दान ही करतात. इतकेच नाही तर ज्या विद्यार्थांकडे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे नव्हते, अशा विद्यार्थांच्या शिक्षणाची जबाबदारीही रजनीकांत यांनी घेतली आहे. कोणताही पब्लिसिटी स्टंट न करता हे सर्व ते लोकांसाठी करतात. यामुळेच दक्षिणेत रजनीकांत यांची देवासारखी पूजा केली जाते.
रजनीकांतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते 'वेट्टैयान' या चित्रपटात शेवटचे दिसला होते. जो यावर्षी 10 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, राणा दग्गुबती, रितिका सिंग आणि फहद फासिल हे देखील मुख्य भूमिकेत होते.












Click it and Unblock the Notifications