Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल, महत्वाचे अपडेट आले समोर
Rajinikanth : सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांची प्रकृती सोमवारी रात्री उशिरा अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना चेन्नईतील अपोलो ग्रिम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीमुळे रजनीकांत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 73 वर्षीय अभिनेता रजनीकांत यांना उपरचारासाठी इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. साई सतीश यांच्या देखरेखीखाली अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

अभिनेता रजनीकांत यांच्यावर आज कार्डियाक कॅथ लॅबमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. याआधी रजनीकांत यांच्या नुकताच आगामी चित्रपट वेट्टय्यानच्या ऑडिओ लाँचमध्ये दिसला होते. जिथे रजनीकांत यांनी स्टेजवर आपल्या आकर्षक डान्सने लोकांना आश्चर्यचा धक्का दिला होता.
एका दमदार पोस्टरसह रिलीजची तारीख जाहीर
2 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्या 'वेट्टियाँ'चा ट्रेलर 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच रजनीकांतचे एक नवीन पोस्टर देखील रिलीज केले आहे. ज्यामध्ये रजनीकांत चष्मा घातलेला अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसून येत आहेत.
'वेट्टियान' या चित्रपटाच्या पोस्टरसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की ध्येय सेट केले आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका एन्काउंटर स्पेशालिस्टच्या विरोधात आहेत. तर रजनीकांत एन्काउंटर स्पेशालिस्टच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा संघर्ष आणि दोन्ही दिग्गजांचा दमदार अभिनय पुन्हा एकदा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.












Click it and Unblock the Notifications